Home / क्रीडा / Arjun Tendulkar Wedding: तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जून-सानियाच्या लग्नाचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Arjun Tendulkar Wedding: तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जून-सानियाच्या लग्नाचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Arjun Tendulkar Wedding: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची लगबग सुरू होणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर...

By: Team Navakal
Arjun Tendulkar Wedding
Social + WhatsApp CTA

Arjun Tendulkar Wedding: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची लगबग सुरू होणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंढोक हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या विशेष प्रसंगासाठी खुद्द सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. सचिनने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींनी या तरुण जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मोलाचा सल्ला दिला असल्याचे सचिनने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या शाही विवाहाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, या लग्नाकडे संपूर्ण क्रीडा आणि उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे.

कोण आहे सानिया चंढोक?

अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंढोक एका नामांकित व्यावसायिक कुटुंबातील आहे. सानियाचे आजोबा ग्रॅविस ग्रुपचे प्रमुख असून बास्किन-रॉबिन्स आणि द ब्रुकलिन क्रीमरी यांसारखे प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत. सानियाचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झाले असून तिला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. ती सध्या मुंबईत प्राण्यांच्या सेवा-सुविधांशी संबंधित व्यवसाय सांभाळत आहे.

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द

सचिनचा वारसा पुढे चालवताना अर्जुनने वेगवान गोलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले असून नुकताच तो लखनौ सुपर जायंट्स संघात सामील झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गोवा संघाकडून खेळतो. अर्जुनने आतापर्यंत २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८ बळी घेतले असून ६२० धावा केल्या आहेत.

तेंडुलकर कुटुंबाची संपत्ती आणि घर

रिपोर्टनुसार, अर्जुन तेंडुलकरची स्वतःची संपत्ती सुमारे २२ कोटी रुपये आहे. अर्जुन सध्या मुंबईतील एका आलिशान बंगल्यात राहतो, ज्याची किंमत आता १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. २००७ मध्ये सचिनने ही मालमत्ता ३९ कोटी रुपयांना खरेदी केली होती. ६,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू भागात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या