Sanjiv Goenka Viral Video: आयपीएल 2026 मध्ये रविवारी लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) सनरायझर्स हैदराबादवर मिळवलेल्या विजयापेक्षा जास्त चर्चा संघाचे मालक संजीव गोएंका यांच्या प्रतिक्रियेची होत आहे. गेल्या काही दिवसांपासून संघ मालक आणि कर्णधार यांच्यातील संबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चांना या एका घटनेने पूर्णविराम दिला आहे.
मैदानातच झाली ‘मिठी’ आणि चर्चा संपली!
हैदराबादविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात जेव्हा ऋषभ पंतने विजयी चौकार लगावला, तेव्हा स्टँड्समध्ये बसलेले संजीव गोएंका आनंदाने उडी मारताना दिसले. सामना संपल्यानंतर त्यांनी थेट मैदानात धाव घेतली आणि विजयाचा हिरो ठरलेल्या ऋषभ पंतला कडकडून मिठी मारली.
गेल्या आठवड्यात दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर गोएंका आणि पंत यांच्यातील भरमैदानातील चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावर मोठी टीका झाली होती. मात्र, कालच्या या ‘जादूच्या झप्पी’ने जुना सर्व राग विरघळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Goenka ji heads to the ground! Ufff 🔥 pic.twitter.com/FsXvYGt0p5
— Micro-ambitious (@pal36) April 5, 2026
संजीव गोएंका का झाले भावूक?
लखनऊचा संघ घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे दबावाखाली होता. 27 कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात घेतलेल्या ऋषभ पंतच्या फॉर्मवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, कालच्या कठीण परिस्थितीत पंतने नाबाद 68 धावांची खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. मालक आणि कर्णधार यांच्यातील तो भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, संजीव गोएंका यांच्या डोळ्यात विजयाचा आनंद आणि सुटकेचा नि:श्वास स्पष्ट दिसत होता.
OVER THE IN-FIELD! 😍
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
Captain Rishabh Pant guides the chase and finishes it off in style 🤌@LucknowIPL off the mark on the points table +2️⃣
Scorecard ▶️ https://t.co/qC2rF1Hiiz#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvLSG pic.twitter.com/SEDFsub4UD
ऋषभ पंतची ‘कॅप्टन इनिंग’
हैदराबादने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची स्थिती एका वेळी 5 बाद 139 अशी झाली होती. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने हार मानली नाही. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटला सलग दोन चौकार मारून सामना संपवला. या विजयामुळे लखनऊ सुपर जायंट्सने गुणतालिकेत आपले खाते उघडले असून संघात आता उत्साहाचे वातावरण आहे.
हे देखील वाचा –










