Home / क्रीडा / Sanju Samson: बेंचवरून थेट विजयाचा हिरो! ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनच्या यशामागे कोणाचा हात? या खेळाडूचे नाव घेत म्हणाला…

Sanju Samson: बेंचवरून थेट विजयाचा हिरो! ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनच्या यशामागे कोणाचा हात? या खेळाडूचे नाव घेत म्हणाला…

Sanju Samson : अहमदाबादच्या ऐतिहासिक मैदानात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषक उंचावला, पण या संपूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने...

By: Team Navakal
Sanju Samson
Social + WhatsApp CTA

Sanju Samson : अहमदाबादच्या ऐतिहासिक मैदानात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषक उंचावला, पण या संपूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने चमकला तो म्हणजे संजू सॅमसन. एका वेळी संघाबाहेर असलेल्या संजूने या स्पर्धेत ३२१ धावा कुटल्या आणि ‘मालिकावीर’ (Player of the Tournament) पुरस्कारावर आपले नाव कोरले.

या यशानंतर भावूक झालेल्या संजूने आपल्या या प्रवासात भारतरत्न सचिन तेंडुलकरने कशी मदत केली, याचे गुपित उघड केले आहे.

सचिन तेंडुलकर यांचा तो एक फोन आणि बदललेलं नशीब

संजूने सांगितले की, जेव्हा तो खराब फॉर्ममुळे त्रस्त होता आणि संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा त्याने थेट सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधला. “मी सचिन सरांच्या सतत संपर्कात होतो. जेव्हा मला संधी मिळत नव्हती, तेव्हा माझी मानसिकता कशी असावी, याबद्दल त्यांनी मला मार्गदर्शन केले. अगदी अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशीही त्यांनी मला फोन करून माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्याकडून मिळालेली स्पष्टता आणि खेळाची समज माझ्यासाठी खूप मोलाची ठरली,” असे संजूने पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

बेंचवरून थेट विजयाचा हिरो

संजू सॅमसनचा हा प्रवास सोपा नव्हता. विश्वचषकाच्या सुरुवातीला तो अंतिम ११ मध्येही नव्हता. अभिषेक शर्माला झालेल्या आजारपणामुळे त्याला संधी मिळाली, पण पुन्हा त्याला बाहेर बसावे लागले. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संघात परतल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

  • वेस्ट इंडिजविरुद्ध: १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद ९७ धावांची खेळी.
  • इंग्लंडविरुद्ध (उपांत्य फेरी): ८९ धावांची वादळी खेळी.
  • न्यूझीलंडविरुद्ध (अंतिम फेरी): ४६ चेंडूत ८९ धावांचे योगदान.

‘माझे स्वप्न भंगले होते, पण देवाची इच्छा वेगळी होती’

आपल्या भावना व्यक्त करताना संजू म्हणाला, “२०२४ च्या विश्वचषकात मला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर मी पूर्णपणे खचलो होतो. मला वाटले माझे स्वप्न भंगले आहे. पण मी पुन्हा उभा राहिलो आणि कठोर परिश्रम केले. देवाची कृपा आणि माझ्या जिद्दीमुळे आज मी देशासाठी हे साध्य करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.”

या स्पर्धेत संजू भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सलग तीन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने मॅच-विनिंग खेळी करून आपण मोठ्या सामन्यांचा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. या कामगिरीमुळे आता भारतीय संघात त्याचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या