Sheetal Devi: भारताची युवा पॅरा-तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) हिने कोरियातील ग्वांगजू येथे सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये (Para World Archery Championships 2025) इतिहास रचला. या स्पर्धेत तिने तिरंदाजीमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
शीतल देवीने महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात तिने तुर्कीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ओजनुर क्युर गिर्डी (हिला 146-143 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
एकाच स्पर्धेत तीन पदकांची कमाई
शीतलचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक आहेत. तिने महिला कंपाऊंड वैयक्तिक (ओपन) प्रकारात सुवर्णपदक, कंपाऊंड महिला सांघिक (ओपन) प्रकारात सरिता सोबत मिळून रौप्यपदक आणि मिश्र सांघिक (Mixed Team) कंपाऊंड प्रकारात तोमन कुमार सोबत कांस्यपदक जिंकले आहे.
SHEETAL DEVI IS WORLD PARA CHAMPION! 🥇🇮🇳
— World Archery (@worldarchery) September 27, 2025
18-year-old beats the reigning champion Oznur Cure in Gwangju.#WorldArchery #ParaArchery pic.twitter.com/d5jDmdYkhq
अंतिम सामन्याचा थरार आणि मानसिक कणखरता
वैयक्तिक सुवर्णपदकाचा अंतिम सामन्यात शीतलने कमालीची मानसिक कणखरता दाखवत आपला संयम राखला. पहिली फेरी 29-29 अशी बरोबरीत सुटल्यानंतर, दुसऱ्या फेरीत शीतलने तीनवेळा अचूक 10 गुण मिळवत 30-27 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ही आघाडी तिने शेवटपर्यंत कायम राखली. निर्णायक अशा पाचव्या फेरीत शीतल देवीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत 146-143 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले.
सांघिक स्पर्धेत रौप्यपदक
यापूर्वी कंपाऊंड महिलांच्या सांघिक अंतिम सामन्यात शीतल आणि सरिता या भारतीय जोडीला तुर्कीच्या जोडीकडून 148-152 गुणांनी पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
हे देखील वाचा – Actor Vijay Karur Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर