Shikhar Dhawan Chahal Viral Reel: भारतीय क्रिकेट संघातील दोन लोकप्रिय चेहरे माजी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि लेग-स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या विनोदी अंदाजाने धुमाकूळ घालत आहेत.
क्रिकेटच्या मैदानापासून दूर असले तरी हे दोन्ही खेळाडू मजेदार कंटेंट तयार करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच दोघांनी त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक धमाल व्हिडिओपोस्ट केला आहे, ज्यामध्ये क्लासिक बॉलीवूड कॉमेडीचा तडका देण्यात आला आहे.
बॉलिवूडचा डायलॉग आणि गब्बरची मस्ती
या व्हायरल व्हिडिओमध्ये शिखर धवन हा युजवेंद्र चहलला अभिनेत्री सोफी शाइन (Sophie Shine) सोबत भेटवून देताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्या एका प्रसिद्ध विनोदी संवादावर आधारित आहे. आपल्या मनमौजी आणि खोडकर स्वभावाला साजेसा अभिनय करत धवनने पुरी यांचा प्रसिद्ध डायलॉग “तेरी भी शादी करा देंगे,” म्हणताना दिसत आहे.
यावर युजवेंद्र चहलची आलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
“एक बार फिर दूल्हा बनने का मन है बेटा… तू रुक जा थोड़ा।” या कॅप्शनसह ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अनेक युजर्सने तर या दोघांनी एकत्र कॉमेडी शो करावा, असा सल्लाही दिला आहे.
दरम्यान, ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. दुसरीकडे, युजवेंद्र चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसला तरी तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, तो आयपीएलमध्ये सक्रिय असून सध्या पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. क्रिकेटपासून दूर असतानाही या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे.
हे देखील वाचा – रणजी सराव सामन्यात पृथ्वी शॉचा ‘हिट शो’! 181 धावांवर बाद होताच जुन्या सहकाऱ्यावर बॅट घेऊन धावला; पाहा व्हिडिओ