Shreyas Iyer ODI captaincy: भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) कर्णधारपदावरून मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer ODI captaincy) भारतीय वनडे संघाचापुढील कर्णधार होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि निवड समिती अय्यरला 2027 च्या विश्वचषकापर्यंत दीर्घकालीन पर्याय म्हणून पाहत आहेत.
नुकतेच, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नुकतेच शुभमन गिलला आशिया चषकासाठी (Asia Cup 205) उपकर्णधार बनवले आहे. मात्र, आशिया चषकासाठी अय्यरची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे निवड समितीच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. आता बीसीसीआय अय्यरकडे थेट वनडे संघाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यरला प्राधान्य का ?
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. विशेषतः, या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाच सामन्यांत त्याने 243 धावा केल्या.
0 वनडे सामन्यांमध्ये 48.22 च्या सरासरीने 2845 धावा आणि 5 शतकांसह, अय्यरची फलंदाजीमधील क्षमता सिद्ध झाली आहे. आता त्याचे नेतृत्व गुणही विचारात घेतले जात आहेत.
रोहित शर्माच्या निर्णयावर भवितव्य
श्रेयस अय्यरच्या नियुक्तीचा निर्णय रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या भविष्यावर अवलंबून आहे. रोहित शर्माने या वर्षी 38 वर्षे पूर्ण केली आहेत. तो आणि विराट कोहलीने आधीच टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका असू शकते, अशी शक्यता आहे.
रोहितनंतर शुभमन गिलला तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निवड समितीचा विचार होता. मात्र, आता जर रोहितने वनडे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तर ऑस्ट्रेलिया मालिकेपासून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.
हे देखील वाचा –
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा