Shreyas Iyer : श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर आल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याची प्रकृती आता सुधारत आहे आणि स्थिर आहे. बीसीसीआयने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम नियुक्ती केली आहे. पुढील काही दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने कमालीची चपळता दाखवली आणि मागे धावत एक शानदार झेल घेतला. या सामन्यात चेंडू पकडण्यासाठी मागे धावताना त्याचा तोल गेला. या सागळ्यातं त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली.

काही वृत्तांनुसार दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता, त्यामुळे त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे, सध्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याच्या पुनरागमनासाठी विशिष्ट वेळ निश्चित सांगणे कठीण आहे. ३१ वर्षीय अय्यर भारतात परतण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी किमान एक आठवडा सिडनीच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देख-रेखी खाली असेल. श्रेयस अय्यरचे कुटुंबीय लवकरच सिडनीला पोहोचतील जेणेकरून ते त्याच्यासोबत राहतील आणि त्याच्या बरे होण्यास त्याची मदत करतील.
हे देखील वाचा – Government school : शाळांची दुरावस्था; कि शहरातील खाजगी शाळांची भुरळ….









