Home / क्रीडा / Smriti Mandhana : ‘क्रिकेटपेक्षा दुसऱ्या कशावरही जास्त प्रेम नाही’; लग्न मोडल्यानंतर प्रथमच बोलली स्मृती मानधना

Smriti Mandhana : ‘क्रिकेटपेक्षा दुसऱ्या कशावरही जास्त प्रेम नाही’; लग्न मोडल्यानंतर प्रथमच बोलली स्मृती मानधना

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच महिला विश्वचषक 2025 चा करंडक पटकावला. या ऐतिहासिक विजयात संघाची उपकर्णधार स्मृती...

By: Team Navakal
Smriti Mandhana
Social + WhatsApp CTA

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच महिला विश्वचषक 2025 चा करंडक पटकावला. या ऐतिहासिक विजयात संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. विश्वचषक विजयानंतर स्मृतीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण परिस्थितीतून जावे लागले.

सुमारे 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी 23 नोव्हेंबर रोजी स्मृती विवाहबद्ध होणार होती. मात्र, काही अडचणींमुळे हा विवाह सोहळा आधी स्थगित करण्यात आला आणि नंतर 7 डिसेंबर रोजी स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे लग्न मोडल्याचे जाहीर केले. लग्न मोडल्यानंतर नुकतीच स्मृती एका कार्यक्रमात उपस्थित राहिली. यावेळी तिने क्रिकेटविषयी भाष्य केले.

भारतीय जर्सी म्हणजे सर्व अडचणी बाजूला

संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतर स्मृतीचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. अमेझॉन संभव शिखर परिषदेत कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याबरोबर स्मृतीने सहभाग घेतला. यावेळी स्मृतीने क्रिकेटच्या मैदानावरील तिच्या मानसिक स्थितीबाबत आणि प्रेरणास्थानाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

स्मृतीने सांगितले की, “खरं सांगायचं झालं तर, खेळावर असलेले प्रेम… आणि मला वाटत नाही की, मी आयुष्यात कशावरही क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम करते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी जाता किंवा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरता, तेव्हा मनात दुसरे कोणतेही विचार नसतात. जेव्हा तुम्ही भारताची जर्सी घालता, तेव्हा तुम्हाला फक्त भारताचे प्रतिनिधित्व करायचे असते आणि देशासाठी मॅच जिंकायची असते.”

स्मृतीने पुढे म्हटले की, “सर्वात मोठे मोटिव्हेशन हे, जेव्हा तुम्ही जर्सी घालता आणि त्यावर भारत लिहिलेले असते. मी सर्वांना नेहमीच सांगत असते की एकदा का तुम्ही जर्सी घातली की तुम्ही तुमच्या सर्व अडचणी बाजूला ठेवता आणि मैदानात उतरता, कारण तुमच्यावर जबाबदारी असते आणि तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन अब्ज लोकांपैकी एक असता.”

लहानपणापासूनच ध्येय स्पष्ट

12 वर्षांपासून देशासाठी क्रिकेट खेळत असलेल्या स्मृतीने सांगितले की, “लहानपणापासूनच बॅटिंग करण्याचे वेड होते. कोणीही समजू शकत नव्हते, पण माझ्या डोक्यात कायम हेच होते की मला विश्वविजेती म्हणून ओळखले जावे.”

विश्वचषक ट्रॉफीबद्दल स्मृतीने म्हटले की, “ही ट्रॉफी आमच्या टीमच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाचे फळ आहे. कित्येकदा गोष्टी आपल्यानुसार घडत नाहीत. आम्ही फायनल मॅचपूर्वीच हा क्षण मनात अनुभवला होता आणि जेव्हा स्क्रीनवर तो क्षण प्रत्यक्षात उतरताना पाहिला तेव्हा अंगावर काटा आला. हा क्षण अविश्वसनीय आणि खूपच खास होता.”

फायनल मॅचमध्ये दिग्गजांची उपस्थिती: स्मृतीने सांगितले की, फायनल मॅचमध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या उपस्थितीमुळे भावना अधिक तीव्र झाल्या होत्या. “आम्हाला खरंच त्यांच्यासाठी जिंकायचं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून वाटले की, संपूर्ण महिला क्रिकेट जिंकत आहे. ही लढाई म्हणजे त्यांचाही विजय होता.”

संघात मतभेद म्हणजे समस्या नव्हे

स्मृतीला यावेळी संघात होणाऱ्या मतभेदांबद्दल विचारले असता स्मृतीने स्पष्ट केले की, “मला वाटते की, पहिल्यांदा तर मी याकडे एक समस्या म्हणून पाहात नाही. देशासाठी गेम जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि देशासाठी आपण गेम कसा जिंकू शकतो याबद्दल प्रत्येकाला त्याचे मत असते. पण खरं सांगायचं तर, जर आमच्यात त्या चर्चा किंवा वाद झाले नाहीत तर आम्ही मैदानावर जिंकणार नाही. कारण जर आपल्यात अशा प्रकारच्या चर्चा होत नसतील जिथे आम्ही एखाद्या गोष्टीवर सहमत नसू, याचा अर्थ आम्ही संघासाठी मॅच जिंकण्याची आमची इच्छा पुरेशी तीव्र नाहीये. त्यामुळे आमच्यात तशा प्रकारच्या चर्चा नक्कीच होतात.”

स्मृतीने सांगितले की, “या वर्ल्ड कप मॅचद्वारे आम्ही दोन महत्त्वाचे धडे शिकलो. मागील डावात तुम्ही सेंच्युरी केली असली तरीही प्रत्येक डाव हा शून्यातून सुरू होतो आणि कधीही स्वतःसाठी खेळू नका, हे आम्ही सतत एकमेकांना सांगत होतो.”

हे देखील वाचा- Goa Nightclub Fire : नाईटक्लब आगीत जळत असताना लुथरा बंधूंनी थायलंडचे तिकीट बुक केले! अटकेपासून वाचण्यासाठी आरोपींचा कारनामा

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या