Home / क्रीडा / स्मृती मानधनाची इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक 112 धावांची वादळी खेळी, केला ‘हा’ मोठा विक्रम

स्मृती मानधनाची इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक 112 धावांची वादळी खेळी, केला ‘हा’ मोठा विक्रम

Smriti Mandhana Record | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे T20I सामन्यात पहिले शतक झळकावून इतिहास रचला....

By: Team Navakal
Smriti Mandhana Record

Smriti Mandhana Record | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे T20I सामन्यात पहिले शतक झळकावून इतिहास रचला. क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, T20I) शतक करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत नेतृत्व करताना मानधनाने 62 चेंडूंमध्ये 112 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामुळे भारताने T20I मधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारताने या सामन्यात 5 बाद 210 धावांचा डोंगर उभारला. तर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सर्वबाद 113 धावापर्यंतच मजल मारू शकला. अशाप्रकारे भारताने 97 धावांनी विजय मिळवला.

शानदार खेळी आणि विक्रम

मानधनाने 51 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, ज्यात 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यासह तिने हरमनप्रीत कौरच्या 103 धावांच्या T20I विक्रमाला मागे टाकले. इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाज सोफी एक्लेस्टोन आणि लॉरेन बेल यांच्याविरुद्ध तिने आक्रमक फटकेबाजी केली.

या विक्रमासह ती हेथर नाईट, टॅमी ब्यूमॉन्ट, लॉरा वुलव्हार्ट आणि बेथ मुनी यांसारख्या मोजक्या खेळाडूंच्या एलिट क्लबमध्ये सामील झाल्या.

या सामन्यात शफाली वर्मा (22 चेंडूंमध्ये 20 धावा) लवकर बाद झाल्यानंतर मानधनानेनी हरलीन देओलसोबत (23 चेंडूंमध्ये 43 धावा) 94 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. शफालीसोबत तिची 50+ धावांची 21 वी भागीदारी हा महिला T20I मधील सर्वोच्च विक्रम आहे. दुखापतीमुळे हरमनप्रीत अनुपस्थित असताना मानधना यांनी नेतृत्व आणि फलंदाजीने भारतीय संघाला नवे यश मिळवून दिले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या