ED Summoned Shikhar Dhawan : भारताचा स्टार क्रिकेटपटू (Indian cricketer) आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) चा सलामी जोडीदार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला बेटिंग ॲप (Betting app) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले असून आज त्याची चौकशी करण्यात आली. धवन सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर झाला.
वन एक्स बेट या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या तपासाच्या अनुषंगाने धवनची चौकशी करण्यात आली. धवन काही जाहिरातींमुळे या ॲपशी संबंधित होता. ईडी या ॲपशी असलेल्या त्यांच्या संबंधांची चौकशी करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ईडीने अवैध ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मविरोधात मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात यापूर्वी माजी क्रिकेटर सुरेश रैना यालाही चौकशीसाठी बोलावले गेले होते. रैनाला वन एक्स बेटने ब्रँड अॅम्बेसॅडर म्हणून नेमले होते. ईडीने बेटिंग अॅपला प्रोत्साहन देणाऱ्या इतरही अनेक सेलिब्रिटींवर कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये हरभजन सिंग, युवराज सिंग, सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणांचा प्रस्ताव