Tata Sierra Gift to Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. खेळाडूंच्या या अपूर्व कामगिरीबद्दल आणि देशासाठी अभिमानास्पद क्षण आणल्याबद्दल टाटा मोटर्सने टीमच्या प्रत्येक सदस्याला लवकरच लॉन्च होणारी नवीन Tata Sierra SUV भेट देण्याची मोठी घोषणा केली आहे. भारतीय महिलांच्या जिद्द आणि समर्पणाचा हा एक खास सन्मान आहे.
2 नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी दणदणीत विजय मिळवला. महिलांच्या क्रिकेट इतिहासात भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे.
टॉप कार मॉडेल देणार गिफ्ट
टाटा मोटर्सने जाहीर केल्यानुसार, विश्वविजेत्या महिला संघातील प्रत्येक सदस्याला Tata Sierra SUV चे टॉप मॉडेल भेट म्हणून दिले जाईल. या एसयूव्हीचे लॉन्चिंग आगामी 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि भेट म्हणून कंपनी पहिल्या बॅचमधील गाड्या देईल.
पुन्हा येत आहे Tata Sierra
90 च्या दशकात ‘लाइफस्टाइल व्हीकल’ म्हणून ओळखली जाणारी Tata Sierra, आता तीन दशकांनंतर पूर्णपणे नवीन अवतारात येत आहे.
किंमत: Tata Sierra ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 13.50 लाख ते 24 लाख रुपये दरम्यान असू शकते. बाजारात ती Mahindra Thar Roxx आणि MG Hector सारख्या एसयूव्हींना टक्कर देईल.
डिझाईन: नवीन सिएराचा बाह्यभाग जुन्या डिझाईनची आठवण करून देणारा आणि त्याच वेळी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा आहे. यात कनेक्टेड एलईडी (LED) लाईट बार, ‘SIERRA’ नेमप्लेट आणि डुअल-टोन अलॉय व्हील्स मिळतील. जुन्या सिएराचा खास ‘रॅप-अराउंड ग्लास’चा लूक आधुनिक स्टाईलने पिलर्सवर जपण्यात आला आहे.
इंटिरियर आणि फीचर्स: केबिनमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ट्रिपल-स्क्रीन सेटअप असेल. सुरक्षिततेसाठी लेव्हल-2 ADAS, मनोरंजनासाठी पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखे प्रीमियम फीचर्स यात उपलब्ध असतील.
इंजिन पर्याय: कंपनीच्या धोरणानुसार, सिएरा सुरुवातीला 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. पुढील वर्षाच्या अखेरीस याचा ऑल-इलेक्ट्रिक (All-Electric) व्हेरिएंटही बाजारात येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Jio IPO : Jio आणणार भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा IPO? किती असेल व्हॅल्युएशन? जाणून घ्या









