Home / क्रीडा / Team India Schedule 2026: टीम इंडियासाठी 2026 ठरणार ‘पॅक्ड’! टी-20 वर्ल्ड कपपासून ते अनेक मोठ्या मालिकांपर्यंत; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule 2026: टीम इंडियासाठी 2026 ठरणार ‘पॅक्ड’! टी-20 वर्ल्ड कपपासून ते अनेक मोठ्या मालिकांपर्यंत; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule 2026 : भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी 2026 हे वर्ष मैदानावर खूप धावपळीचे असणार आहे. वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या...

By: Team Navakal
Team India Schedule 2026
Social + WhatsApp CTA

Team India Schedule 2026 : भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी 2026 हे वर्ष मैदानावर खूप धावपळीचे असणार आहे. वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपासून होईल, तर फेब्रुवारीमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. गतविजेता संघ म्हणून भारत आपली पहिली मॅच 7 फेब्रुवारीला मुंबईत खेळणार आहे. यंदाच्या वर्षात भारतीय संघ तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये एकूण 49 द्विपक्षीय सामने खेळण्याची शक्यता आहे.

Team India Schedule 2026: 2026 मधील प्रमुख मालिका आणि वर्ल्ड कप

11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने भारताच्या मोहिमेला सुरुवात होईल. यंदा भारत एकूण 18 एकदिवसीय सामने खेळणार आहे. यामध्ये जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचे 3 सामने आणि जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांचा समावेश आहे. आयपीएल 2026 संपल्यानंतर टीम इंडियाच्या वेळापत्रकात कसोटी सामन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, जेणेकरून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील कसोटी आव्हान

कसोटी क्रिकेटमधील ढासळलेली कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान कर्णधार शुबमन गिलसमोर असणार आहे. यासाठी ऑगस्टमध्ये श्रीलंका दौरा आणि वर्षाच्या शेवटी न्यूझीलंड दौरा भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. 2026 च्या अखेरपर्यंत भारत एकूण 20 टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर 2027 च्या सुरुवातीला मायदेशात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीकडे सर्वांचे लक्ष असेल.

Team India Schedule 2026: टीम इंडियाचे 2026 मधील वेळापत्रक

महिनामालिकायजमानसामने
जानेवारी 2026न्यूझीलंडचा भारत दौराभारत3 वनडे, 5 टी-20
जून 2026अफगाणिस्तानचा भारत दौराभारत1 कसोटी, 3 वनडे
जुलै 2026इंग्लंडचा भारत दौराभारत3 वनडे, 5 टी-20
ऑगस्ट 2026भारताचा श्रीलंका दौराश्रीलंका2 कसोटी
सप्टेंबर 2026भारताचा अफगाणिस्तान दौराअफगाणिस्तान3 टी-20
सप्टेंबर-ऑक्टोबरवेस्ट इंडिजचा भारत दौराभारत3 वनडे, 5 टी-20
ऑक्टोबर-नोव्हेंबरभारताचा न्यूझीलंड दौरान्यूझीलंड2 कसोटी, 3 वनडे, 5 टी-20
डिसेंबर 2026श्रीलंकेचा भारत दौराभारत3 वनडे, 3 टी-20

राजकीय तणावामुळे बांगलादेशचा नियोजित दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वेळापत्रकात त्या सामन्यांचा समावेश नाही. एकूणच क्रिकेट चाहत्यांसाठी हे वर्ष मनोरंजनाने भरलेले असणार आहे.

हे देखील वाचा – MG Windsor EV : टाटा मोटर्सला मोठा धक्का! ‘ही’ ठरली 2025 मधील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार; पाहा खासियत

Web Title:
संबंधित बातम्या