Home / क्रीडा / Virat Kohli : विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; ‘घरच्या मैदानावर’ सचिनचा ‘हा’ विक्रम लवकरच मोडणार

Virat Kohli : विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; ‘घरच्या मैदानावर’ सचिनचा ‘हा’ विक्रम लवकरच मोडणार

Virat Kohli Century record : भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा एक मोठा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध...

By: Team Navakal
Virat Kohli Century record
Social + WhatsApp CTA

Virat Kohli Century record : भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा एक मोठा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI Match) त्याने शानदार शतक झळकावले. या शतकासह कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 84 शतके पूर्ण केली.

मात्र, या शतकाचे खरे महत्त्व हे आहे की हे त्याचे भारतीय भूमीवर केलेले 40 वे शतक ठरले. यामुळे, सचिन तेंडुलकरच्या ‘सर्वाधिक घरच्या मैदानावर शतके’ या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला आता केवळ दोन शतकांची गरज आहे. कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा आदर्श असलेल्या सचिनच्या 42 शतकांच्या विक्रमाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

सचिन तेंडुलकरच्या विक्रमाकडे वेगाने

विराट कोहलीने या शतकाद्वारे टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन डावांमध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने सिडनीमध्ये 74 धावांची नाबाद खेळी केली होती आणि त्यानंतर रांची येथे 135 धावांची दमदार खेळी केली. यानंतर रायपूरमध्ये त्याने आणखी एक जबरदस्त शतकी खेळी केली.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत विराट आता सचिनच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके:

खेळाडूशतके
सचिन तेंडुलकर42
विराट कोहली40
रिकी पॉन्टिंग36
जो रूट34
डेव्हिड वॉर्नर31

सामन्यातील शतकी खेळी

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसयी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 359 धावांचे विशाल आव्हान दिले होते, मात्र दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. परदेशात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमधील दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात मोठा विजय ठरला.

रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कोहलीने 93 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वाल संघर्ष करत असताना कोहलीने डाव सावरला. जैस्वाल 22 धावांवर बाद झाल्यानंतर कोहलीने ऋतुराज गायकवाडसोबत 156 चेंडूंमध्ये 195 धावांची मोठी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. याच दरम्यान ऋतुराज गायकवाडनेही एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक (105 धावा) झळकावले.

हे देखील वाचा – Mohit Sharma Retirement : धोनीचा खास गोलंदाज; IPL मध्ये ‘पर्पल कॅप’ जिंकणाऱ्या मोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या