Yashasvi Jaiswal | राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) यंदाचा आयपीएल (IPL 2025) सीझन फारसा चांगला राहिलेला नाही. संघाने 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामन्यात विजय मिळवला. अंकतालिकेत देखील संघ 9व्या स्थानावर आहे. मात्र, संघाचा प्रमुख फलंदाज यशस्वी जैस्वालसाठी (Yashasvi Jaiswal) यंदाचा सीझन चांगला राहिला. त्याने 14 सामन्यात 559 धावा केल्या. मात्र, आता एका पोस्टमुळे राजस्थान रॉयल्स व जैस्वालमध्ये सर्वकाही सुरळीत आहे का? याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
यशस्वी जैस्वालने इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे तो राजस्थानचा संघ सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. तसेच, कोलकाताच्या संघात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली.
यशस्वी जैस्वालच्या पोस्टमुळे सुरू झाली चर्चा
आपल्या इंस्टाग्रामसाठी पोस्टमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सला थँक्यू म्हटले. त्याने लिहिले की, सर्व गोष्टींसाठी राजस्थान रॉयल्सचे आभार. हंगाम अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तरीही या प्रवासासाठी धन्यवाद.
Is It The Last Season of Yashasvi Jaiswal With Rajasthan Royals ??
— Crictale_Yash (@FeelTuner84754) May 21, 2025
Looks Like Jaiswal is Leaving This Franchise 🙂 pic.twitter.com/D99OfoyIlj
ही पोस्ट पाहून अनेकांनी तर्क लावले की जैस्वाल फ्रँचायझी सोडून केकेआरकडे जाण्याच्या (KKR) तयारीत आहे. काही चाहत्यांनी तर तो ट्रेड विंडोअंतर्गत केकेआरमध्ये सामील होऊ शकतो, असेही म्हटले.
‘टुगेदर’ विसरला आणि अर्थच बदलला
मात्र, ही सगळी गडबड झाली ती एका शब्दामुळे. यशस्वी जैस्वालच्या मूळ पोस्टमध्ये तो “journey together” असा उल्लेख करायचा होता, पण त्याने ‘टुगेदर’ (together) लिहायचं विसरल्यामुळे पोस्टचा अर्थच बदलून गेला.
यानंतर त्याने ती पोस्ट एडिट करून ‘टुगेदर’ जोडला आणि गोंधळ दूर केला. त्यामुळे सध्या तरी तो राजस्थान रॉयल्स सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले.