Yuzvendra Chahal Hat-trick : चहलच्या फिरकीने चेन्नईच्या फलंदाजांना नाचवले! आयपीएल 2025 मध्ये घेतली पहिली हॅट्रिक

Yuzvendra Chahal Hat-trick vs CSK

Yuzvendra Chahal Hat-trick vs CSK | पंजाब किंग्सचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) खेळताना आपल्या आयपीएल (IPL) कारकिर्दीतील दुसरी हॅट्रिक नोंदवून ऐतिहासिक कामगिरी केली. चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान त्याने आपल्या तिसऱ्या षटकात सलग तीन चेंडूंवर विकेट्स घेतल्या.

2023 नंतर IPL मधील पहिली हॅट्रिक

ही IPL 2023 नंतरची (IPL Hat-trick) पहिली हॅट्रिक ठरली. चहलने एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळताना चेन्नईचे दीपक हुड्डा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना सलग चेंडूंवर बाद केलं. त्याआधी त्याने 19व्या षटकात एमएस धोनीला (MS Dhoni) झेलबाद करत सामन्यात निर्णायक वळण आणलं.

पंजाबसाठी हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज

चहल पंजाब किंग्ससाठी हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंगने दोन वेळा, तर अक्षर पटेल आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एक हॅट्रिक घेतली होती. चहलच्या या घातक गोलंदाजीमुळे पंजाबने चेन्नईवर मात केली.

आयपीएलमध्ये चहलची ही दुसरी हॅट्रिक आहे. यापूर्वी त्याने 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) ही कामगिरी केली होती. आता तो युवराज सिंगनंतर दोन हॅट्रिक करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अमित मिश्राकडे आयपीएलमधील सर्वाधिक तीन हॅट्रिक आहेत.

चहल आयपीएलच्या इतिहासात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स सर्वाधिक वेळा घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने हे काम 9 वेळा केलं आहे. त्यामागे सुनील नरेन (8), लसिथ मलिंगा (7) आणि कागिसो रबाडा (6) हे खेळाडू आहेत.

दरम्यान, पंजाब आणि चेन्नईच्या सामन्याबद्दल सांगायचे तर प्रथम फलंजाजी करताना चेन्नईचा संघ 19.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 190 धावापर्यंतच मजल मारू शकला. तर पंजाबच्या संघाने 6 विकेट्स गमावत 19.4 षटकात 194 धावा करत सामन्यात विजय मिळवला.