\’लाखामंडल\’ मृत व्यक्तीला जिवंत करणारे मंदिर…

भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत पण, मेलेल्या भक्तांनाच थेट जिवंत करणारे असेही एक रहस्यमयी मंदिर भारतात आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून काही अंतरावर असलेल्या या \’लाखामंडल\’च्या मंदिरात मृतदेह नेल्‍यास त्यात आत्मा पुन्हा प्रवेश करतो असे म्हणतात.

मंदिराच्या प्रांगणात असलेल्या जागृत महामंडेश्वर शिवलिंगासमोर पश्चिमेकडे तोंड करून उभे असलेले दोन द्वारपाल आहेत, त्यापैकी एकाचा हात कापला असून हेही एक न सुटलेले रहस्यच आहे. या द्वारपालांच्या आणि शिवलिंगाच्या बरोबर मध्यभागी जर एखादा मृतदेह ठेवला आणि मंदिराच्या पुजार्‍यांनी त्यावर पवित्र पाणी शिंपडले तर तो मृत व्यक्ती काही काळासाठी पुन्हा जिवंत होतो. जिवंत झाल्यानंतर तो देह परमेश्वराच्या नावाचा जप करतो. त्यानंतर पुजारी त्या मृतदेहाच्या तोंडात दूध-भात भरवला जातो आणि त्याला गंगेचे पाणी अर्पण केले जाते. ज्या क्षणी हे गंगाजल देहाच्या तोंडात जाते त्या क्षणी आत्मा पुन्हा शरीर सोडून जातो. या ठिकाणी भटकत राहणाऱ्या आत्म्यांना मोक्ष प्राप्ती होते असे म्हणतात. हा चमत्कार कसा होतो यामागचे रहस्य काय आहे हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. आजही हे एक गूढच राहिले आहे.

लाखामंडल आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या मृत्यू्च्या कथा यांचा संबंध पार महाभारताशी जोडला जातो असे म्हणतात की, पांडवांना जिवंत जाळण्यासाठी कौरवांनी हे लक्षागृह बांधले होते. परंतु शंकर-पार्वतीने त्यांना वाचवले. पांडवांना एक गुहा दिसली आणि ते गुहेतून पळून गेले. त्यानंतर युधिष्ठिराने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती, अशीही एक मान्यता आहे.

Scroll to Top