\’अग्रसेन की बावली\’ काळ्या पाण्याची शापित विहीर

नवी दिल्लीच्या जंतरमंतर भागात शहराच्या मधोमध १०५ पायऱ्यांची एक विहीर आहे. सूर्यास्तानंतर या विहिरीच्या तळाशी एखादी व्यक्ती अडकली तर विहिरीतले काळे पाणी व्यक्तीला स्वत:कडे आकर्षित करते आणि ती व्यक्ती आत्महत्या करते असे म्हणतात.काळ्या पाण्यात उड्या टाकून स्वत:चे आयुष्य संपवलेल्या माणसांच्या अनेक गूढ गोष्टी इथले गावकरी सांगतात. लोकांचा बळी घेणाऱ्या या शापित विहिरीचे नाव आहे अग्रसेन की बावली…

सूर्यास्तानंतर ही विहीर पाहण्यासाठी गेलेला एकही व्यक्ती पुन्हा कधी जिवंत बाहेर आलाच नाही असे म्हणतात. १०५ पायऱ्यांची विहीर उतरून खाली गेलेला माणूस जर सूर्यास्त होण्यापूर्वी बाहेर आला नाही तर ती व्यक्ती पुन्हा कधी सूर्याचे दर्शन घेऊच शकत नाही. या विहिरीच्या तळाशी असलेले काळे पाणी लोकांना स्वतःकडे खेचून घेते… पाण्यात उडी मारण्यासाठी प्रवृत्त करते…हे पाणी लोकांना संमोहित करते. या विहिरीत रात्री आत्महत्या केलेल्यांचे अतृ्प्त आत्मे भटकत राहतात असे म्हणतात. सूर्यास्तानंतर एखादी व्यक्ती तळाशी राहिली की हेच आत्मे त्याचा पाठलाग करू लागतात आणि त्याला पाणी उडी टाकायला प्रवृत्त करतात असे स्थानिक म्हणतात.

अग्रसेन की बावली ही चौदाव्या शतकात शौर्य वंशातील महाराजा अग्रसेन यांनी बांधली असे मानले जाते. मात्र ही विहीर बांधण्यामागचा नेमका काय हेतू आहे याची इतिहासात कुठेच नोंद नाही.

Scroll to Top