2026 TVS Apache RTR 160 4V price and features : टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये पकड मजबूत करण्यासाठी 2026 TVS Apache RTR 160 4V चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने या मालिकेत 2 नवीन मॉडेल्सचा समावेश केला असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता खालच्या श्रेणीतील व्हेरिएंटमध्येही प्रीमियम फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांना आता कमी किमतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येणार आहे.
काय आहेत नवीन फीचर्स?
2026 रेंजच्या सर्व TVS Apache RTR 160 4V मॉडेल्समध्ये आता फीचर्स वाढवण्यात आले आहेत. नवीन बदलांनुसार आता सर्व बाईक्समध्ये आधुनिक सुविधा पाहायला मिळतील.
- LED DRL सह नवीन प्रोजेक्टर हेडलाईट आणि LED इंडिकेटर्स आता सर्व मॉडेलमध्ये देण्यात आले आहेत.
- गियर बदलणे सोपे व्हावे यासाठी स्लिपर क्लचची सुविधा आता अधिक मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
- महागड्या मॉडेल्समध्ये USD Fork आणि 5 इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे.
- सुरक्षेसाठी टॉप मॉडेलमध्ये ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधा देखील मिळते.
- रायडर्सना गरजेनुसार परफॉर्मन्स बदलता यावा यासाठी यामध्ये तीन रायडिंग मोड्स दिले आहेत.
दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स
बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 160cc चे इंजिन देण्यात आले असून ते 17.55bhp ची शक्ती निर्माण करते. आपल्या श्रेणीतील ही सर्वात शक्तिशाली बाईक्सपैकी एक मानली जाते. मॅट ब्लॅक, रेसिंग रेड, ग्रॅनाइट ग्रे आणि मरीन ब्लू यांसारख्या आकर्षक रंगांमध्ये ही बाईक आता शोरूममध्ये उपलब्ध आहे.
किंमत
अपडेटेड 2026 TVS Apache RTR 160 4V ची सुरुवातीची किंमत 1,25,440 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. यातील हाय-एंड व्हेरिएंटची किंमत 1,37,440 रुपयांपर्यंत जाते.










