Airtel New Plan: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा आणि स्वस्त डेटा पॅक सादर केला आहे. जर तुम्हाला अचानक जास्त इंटरनेटची गरज भासली, तर हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे केवळ 39 रुपयांच्या या रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा वापरता येणार आहे. कंपनीने हा प्लॅन सध्या काही ठराविक राज्यांसाठीच उपलब्ध करून दिला आहे.
एअरटेलचा 39 रुपयांचा डेटा पॅक:
एअरटेलचा हा नवा डेटा पॅक प्रामुख्याने अशा युजर्ससाठी आहे ज्यांना कमी कालावधीसाठी जास्त डेटा हवा असतो.
- किंमत: 39 रुपये.
- वैधता: हा पॅक 3 दिवसांच्या वैधतेसह येतो.
- डेटा: यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळतो. म्हणजेच 3 दिवसांच्या कालावधीत एकूण 9GB हाय-स्पीड डेटा युजर्सना वापरता येईल.
- इतर अटी: दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, अतिरिक्त डेटा वापरण्यासाठी 50 पैसे प्रति MB या दराने शुल्क आकारले जाईल.
- कुठे उपलब्ध आहे?: हा शॉर्ट-टर्म डेटा पॅक सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व) आणि तामिळनाडू या सर्कल्समध्ये उपलब्ध आहे.
33 रुपयांच्या प्लॅनशी तुलना
एअरटेलकडे आधीपासूनच 33 रुपयांचा एक डेटा पॅक उपलब्ध आहे. मात्र, या प्लॅनमध्ये केवळ 1 दिवसाची वैधता आणि 2GB डेटा मिळतो. या तुलनेत 39 रुपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर ठरतो, कारण केवळ 6 रुपये जास्त देऊन तुम्हाला 3 दिवसांची वैधता आणि एकूण 9GB डेटा मिळतो.
लक्षात घ्या की, हे दोन्ही डेटा पॅक केवळ अशाच प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत, ज्यांच्या नंबरवर आधीपासूनच कोणतीतरी व्हॅलिडिटी असलेला मुख्य रिचार्ज प्लॅन सक्रिय आहे.
हे देखील वाचा – BMC Election : “मुंबई महाराष्ट्राची नाही!” भाजप नेते अण्णामलाईंच्या विधानाने राजकारण पेटले









