Smart TV Sale: सणासुदीचा हंगाम जवळ येताच ग्राहकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या खरेदीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी Amazon आणि Flipkart यांनी 23 सप्टेंबरपासून वर्षातील त्यांच्या सर्वात मोठ्या सेलची घोषणा केली आहे.
मात्र, सेल सुरू होण्याची वाट न पाहता अनेक दिग्गज कंपन्यांनी 55 इंच स्मार्ट टीव्हीवर आधीच आकर्षक डील्स जाहीर केल्या आहेत. तुम्ही जर मोठी स्क्रीन आणि 4K क्वालिटीचा टीव्ही शोधत असाल, तर LG, Sony, Samsung यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सवर मिळत असलेल्या टॉप 5 डील्स नक्की जाणून घ्या.
LG AI TV UA8200 55 inch Ultra HD (4K) LED Smart WebOS TV 2025 Edition
LG कंपनीचा हा 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही अनेक AI फीचर्ससह येतो. या टीव्हीची मूळ किंमत 71,000 रुपयांपेक्षा जास्त असली तरी, आता तुम्ही तो फक्त 44,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. क्रेडिट कार्डवर 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरमध्ये 8,590 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.
SONY Bravia 2 55 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV
जवळपास 1 लाख रुपये किंमतीचा हा Sony स्मार्ट टीव्ही सेलपूर्वी फक्त 57,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. UPI द्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपये आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. याशिवाय, 8,590 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही या टीव्हीवर उपलब्ध आहे.
Samsung Crystal 4K Vision Pro 55 inch Ultra HD (4K) LED Smart Tizen TV
या यादीतील तिसरा टीव्ही Samsung कंपनीचा आहे, ज्याची किंमत 66 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. पण आता हा टीव्ही फक्त 42,490 रुपयांमध्ये मिळत आहे. यावरही Flipkart Axis Bank आणि SBI क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता, ज्यामुळे टीव्हीची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी होते.
XIAOMI by Mi FX Series 55 inch Ultra HD (4K) LED Smart Fire TV
XIAOMI च्या 2025 एडिशन स्मार्ट टीव्हीवर सेलपूर्वीच चांगला डिस्काउंट मिळत आहे. या टीव्हीची मूळ किंमत 54,999 रुपये आहे, पण तुम्ही तो Amazon किंवा Flipkart वरून फक्त 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, Flipkart SBI किंवा Axis Bank क्रेडिट कार्डवर 4000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.
realme TechLife CineSonic 55 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV
जर तुम्ही 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर Realme चा हा टीव्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा टीव्ही तुम्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यावरही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह 4000 रुपये आणि एक्सचेंज ऑफरमध्ये 8,590 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.
हे देखील वाचा – वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा चर्चेत; अपहरण झालेल्या व्यक्तीची थेट घरातून सुटका; नक्की काय घडले?