65 inch Smart TV Republic Day Sale Deals : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ‘रिपब्लिक डे सेल’चा धमाका सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीवर प्रचंड सवलत दिली जात आहे. जर तुम्ही तुमच्या घरासाठी ६५ इंचाचा भव्य ४K स्मार्ट टीव्ही घेण्याच्या विचारात असाल, तर सॅमसंग, सोनी आणि शाओमी सारख्या ब्रँड्सवर हजारो रुपयांची बचत करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
सेलमध्ये उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम ६५ इंच स्मार्ट टीव्ही पर्याय खालीलप्रमाणे आहेत:
१. realme TechLife 164 cm (65 inch) Ultra HD (4K)
फ्लिपकार्ट सेलमध्ये या टीव्हीवर तब्बल ५६ टक्के डिस्काउंट मिळत आहे.
- किंमत: ३४,४९९ रुपये.
- ऑफर्स: एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआयवर १,५०० रुपयांची सूट आणि ६,६५० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.
२. Hisense E6N Series 4K Ultra HD (65 inches)
ॲमेझॉन सेलमध्ये या मॉडेलवर ४८ टक्के सूट दिली जात आहे.
- किंमत: ४१,९९९ रुपये.
- ऑफर्स: एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यास २,००० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. सोबतच ५,९५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे.
३. Samsung Crystal 4K Infinity Vision (65 inch)
सॅमसंगचा हा प्रीमियम टीव्ही ३३ टक्के डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
- किंमत: ५६,९९० रुपये.
- ऑफर्स: एचडीएफसी बँक कार्डवर १,५०० रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट आणि ६,६५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज सवलत मिळत आहे.
४. Xiaomi Smart TV X Pro QLED Series (65 inch)
क्यूलेड (QLED) डिस्प्ले हवा असेल तर शाओमीचा हा टीव्ही ॲमेझॉनवर ३६ टक्के डिस्काउंटसह मिळत आहे.
- किंमत: ५७,९९९ रुपये.
- ऑफर्स: आयसीआयसीआय बँक कार्ड ईएमआयवर ३,००० रुपयांची मोठी सूट उपलब्ध आहे.
५. SONY Bravia 2 Ultra HD (4K) (65 inch)
- सोनीचा हा हाय-एंड टीव्ही ४५ टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर अतिशय स्वस्त मिळत आहे.
- ऑफर्स: एचडीएफसी बँक कार्डवर ३,००० रुपयांची थेट सूट आणि ६,६५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर या डीला अधिक खास बनवते.
- किंमत: ६९,९९० रुपये.
हे देखील वाचा – Mumbai Mayor :मुंबईचा महापौर कोणाचा? अडीच वर्षांच्या प्रस्तावाच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका









