Home / लेख / 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स; Samsung आणि Redmi वर मोठी सूट

15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स; Samsung आणि Redmi वर मोठी सूट

Amazon Sale: कमी बजेटमध्ये एक दमदार स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आता सुवर्णसंधी आली...

By: Team Navakal
Amazon Sale

Amazon Sale: कमी बजेटमध्ये एक दमदार स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आता सुवर्णसंधी आली आहे. वर्षातील सर्वात मोठा सेल म्हणजेच Amazon Great Indian Festival Sale ची सुरुवात 23 सप्टेंबरपासून होत आहे.

या सेलमध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. कंपनीने सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह मिळणाऱ्या काही फोन्सची माहिती जाहीर केली आहे.

सेलमध्ये उपलब्ध असणारे टॉप स्मार्टफोन्स आणि ऑफर्स

Redmi A4 5G:

Redmi चा हा फोन Amazon सेलमध्ये 10,999 रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होईल. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.88 इंच एचडी+ डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर आहे.

Samsung Galaxy M36 5G:

Samsung चा हा फोन सध्या 17,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, पण Amazon च्या सेलमध्ये तो 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. यात 6.7 इंचाचा मोठा सुपर एमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात अनेक शानदार AI फीचर्सही उपलब्ध आहेत.

Realme NARZO 80 Lite 5G:

6000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा फोन सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह मिळेल. हा फोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा 32 मेगापिक्सलचा असून यात Dimensity 6300 प्रोसेसर आहे, ज्यामुळे तो चांगला परफॉर्मन्स देतो.

iQOO Z10x 5G:

6500mAh ची मोठी बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला हा फोनही बंपर डिस्काउंटसह मिळेल. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. यात Dimensity 7300 चिपसेट आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटचा ‘आई केअर डिस्प्ले’ दिला आहे.


हे देखील वाचा –

‘अनेकांना वाटलं माझी राख होतेय, पण…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Asia Cup 2025 स्पर्धेचे बिगुल वाजले! कधी व कुठे पाहाल भारताचे सामने? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या