Home / लेख / स्टारलिंक आणि जिओला मोठी टक्कर! ॲमेझॉनचे ‘ही’ सेवा लवकरच भारतात सुरू होणार

स्टारलिंक आणि जिओला मोठी टक्कर! ॲमेझॉनचे ‘ही’ सेवा लवकरच भारतात सुरू होणार

Amazon Satellite Internet

Amazon Satellite Internet: अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची सॅटेलाइट इंटरनेट पुरवणारी कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करणार आहे. मात्र, स्टारलिंकला ॲमेझॉनकडून (Amazon Satellite Internet) जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

सॅटेलाइट इंटरनेट सेवेच्या स्पर्धेत आता लवकरच ॲमेझॉनचा (Amazon) महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘प्रोजेक्ट कुइपर’ (Project Kuiper) भारतात प्रवेश करणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर ती थेट स्टारलिंक (Starlink) आणि जिओ सॅटेलाइट (Jio Satellite) यांना मोठी टक्कर देईल.

सध्या ‘कुइपर’ ला भारतात लाँच होण्यासाठी परवानग्या आणि सुरक्षा मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे, जी या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

परवानग्या आणि नियमांचे आव्हान

सध्या भारतात सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यासाठी जिओ-एसईएस, वनवेब आणि एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंकला सरकारची परवानगी मिळाली आहे. मात्र, या कंपन्यांना सरकारकडून स्पेक्ट्रम वाटप आणि शुल्क निश्चित झाल्यानंतरच ग्राहकांसाठी सेवा सुरू करता येणार आहे.

प्रोजेक्ट कुइपर अद्याप भारतीय सरकारसोबत नियमांचे पालन करण्याबाबत चर्चा करत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सरकारने सॅटेलाइट कंपन्यांसाठी डेटा लोकलायझेशन, कायदेशीर इंटरसेप्शन आणि देशातच उपकरणांचे उत्पादन यांसारखे कठोर सुरक्षा नियम लागू केले आहेत.

स्पर्धा आणि भविष्यातील योजना

उपग्रहांची संख्या: सध्या कुइपरचे 100 पेक्षा जास्त उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत आहेत, तर स्टारलिंककडे 6,700 हून अधिक आणि वनवेबकडे 648 उपग्रह आहेत. कुइपरची एकूण 3,200 उपग्रहांची योजना आहे. 2028 पर्यंत भारतातील सॅटेलाइट कम्युनिकेशन क्षेत्र 20 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

कुइपरने भारतात एक लहान टीम तयार केली असून ती स्थानिक गरजा आणि नियामक कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या, या कंपनीला शेजारील देशांनाही भारतातून सेवा पुरवण्याची परवानगी हवी आहे, पण सरकारने परवाने फक्त भारतासाठीच लागू असल्याचे स्पष्ट केले आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

1 सप्टेंबरपासून 8 मोठे बदल लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

राज ठाकरे कुचक्या कानाचे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल