Amazon Sale 2026: ॲमेझॉनचा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६’ सध्या जोरात सुरू असून ग्राहकांना घरगुती उपकरणांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये विशेषतः स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना १० टक्के आणि ॲमेझॉन पे आयसीआयसीआय कार्डवर ५ टक्के अतिरिक्त सवलत देऊन हा व्यवहार अधिक फायदेशीर ठरत आहे.
जर तुम्ही ३०,००० रुपयांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर खालील ऑफर्स नक्की तपासा:
१. Redmi Note 14 Pro+ 5G
या यादीत रेडमीच्या या फोनवर सर्वाधिक २२ टक्के सूट मिळत आहे. ३६,९९९ रुपये मूळ किंमत असलेला हा फोन सेलमध्ये २८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. एसबीआय कार्ड ऑफरसह हा फोन तुम्ही २७,९९९ रुपयांना घरी नेऊ शकता.
२. OnePlus Nord CE5
वनप्लसच्या चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे. २८,९९९ रुपयांचा हा फोन सेलमध्ये २४,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. बँक कार्डच्या वापरामुळे या फोनची प्रभावी किंमत २३,९९९ रुपयांपर्यंत खाली येते.
३. Redmi Note 14 Pro 5G
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा हा फोन २३,९९९ रुपयांना सेलमध्ये मिळत आहे (मूळ किंमत ३०,९९९ रुपये). बँक ऑफर्स आणि सवलतींनंतर हा फोन तुम्हाला केवळ २२,७४९ रुपयांना पडेल.
४. Vivo Y400 Pro 5G
विवोच्या या प्रगत ५जी फोनवर १३ टक्के सूट दिली जात आहे. ३१,९९९ रुपयांचा हा फोन २७,९९९ रुपयांना सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. एसबीआय कार्डच्या ईएमआय व्यवहारावर १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळून हा फोन २६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.
५. iQOO Z10 5G
गेमिंग आणि वेगवान वापरासाठी ओळखला जाणारा हा फोन २२,९९८ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. विशेष बँक सवलतींनंतर याची किंमत २१,२४८ रुपयांपर्यंत कमी होते, ज्यामुळे हा या सेगमेंटमधील एक स्वस्त आणि चांगला पर्याय ठरतो.









