Home / लेख / Foldable iPhone: लवकरच लाँच होणार पहिला फोल्डेबल iPhone; भारतात किती असू शकते किंमत? जाणून घ्या

Foldable iPhone: लवकरच लाँच होणार पहिला फोल्डेबल iPhone; भारतात किती असू शकते किंमत? जाणून घ्या

Apple Foldable iPhone: Apple ने काही दिवसांपूर्वीच नवीन iPhone 17 सिरीज लाँच केली असली तरी, आता कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल iPhone...

By: Team Navakal
Foldable iPhone

Apple Foldable iPhone: Apple ने काही दिवसांपूर्वीच नवीन iPhone 17 सिरीज लाँच केली असली तरी, आता कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल iPhone बद्दल चर्चांना वेग आला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर Apple सप्टेंबर 2026 मध्ये iPhone 18 सिरीज आणि नवीन iPhone Air 2 सोबत त्यांचा पहिला फोल्डेबल iPhone लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

हा आगामी iPhone Fold पुस्तकाच्या डिझाइनप्रमाणे असेल आणि तो Samsung, Vivo, Huawei आणि Google Pixel च्या फोल्डेबल स्मार्टफोन्सना थेट टक्कर देऊ शकतो.

Apple Foldable iPhone: टायटॅनियम आणि ॲल्युमिनियमचा फ्रेम

रिपोर्टनुसार, Apple त्यांच्या आगामी फोल्डेबल iPhone मध्ये टायटॅनियम आणि ॲल्युमिनियमच्या मिश्रणातून तयार केलेला फ्रेम सादर करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही धातूंचा वापर केल्याने Apple ला टिकाऊपणा आणि वजन योग्यरित्या संतुलित करता येईल.

या वर्षाच्या सुरुवातीला Apple चे विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी देखील सांगितले होते की, या डिव्हाईसमध्ये टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टीलचे मिश्रण असू शकते.

iPhone Fold चे संभाव्य फीचर्स

  • फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, iPhone Fold मध्ये 7.8-इंच आतील डिस्प्ले आणि बाहेरील स्क्रीन 5.5-इंचची असू शकते.
  • या डिव्हाईसमध्ये उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्ससह पॉवरफुल A20 Pro चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, या डिव्हाईसमध्ये ड्यूल 48MP मागील कॅमेरे आणि अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • डिव्हाईसमध्ये 5,000 ते 5,500 mAh क्षमतेची बॅटरी असू शकते.

अहवालानुसार, या फोल्डेबल डिव्हाईसमध्ये पॉवर बटणासोबत टच आयडी एकत्रित केलेला मिळू शकतो, जो iPhone साठी पूर्णपणे नवीन असेल. iPhone Fold ची किंमत भारतात सुमारे 1,75,000 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, हे संभाव्य फीचर्स-किंमत आहे. अधिकृत किंमतीचा खुलासा लाँचनंतरच होईल.

हे देखील वाचा – अमेझॉनची AWS सेवा काय आहे? यातील अडथळ्यामुळे हजारो वेबसाइट्स-ॲप्स बंद पडण्याचे नेमके कारण काय?

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या