ॲपलची नवी ऑपरेटिंग सिस्टिम लाँच! ‘या’ आयफोनमध्ये सपोर्ट करणार iOS 26, जाणून घ्या इंस्टॉल करण्याची प्रोसेस

Apple iOS 26

Apple iOS 26 | ॲपलने (Apple) आपल्या वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर कॉन्फरन्स (WWDC) 2025 मध्ये आयफोन्स आणि आयपॅड्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. कंपनीने नवीन आणि रीडिझाइन केलेल्या iOS 26 आणि iPadOS 26 ची घोषणा केली आहे.

या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि सुधारणा असून, ‘लिक्विड ग्लास’ नावाच्या नव्या डिझाइन लँग्वेजचा समावेश आहे. कोणत्या आयफोन्समध्ये iOS 26 चा सपोर्ट मिळेल, ते जाणून घेऊया.

कोणत्या आयफोन्सना iOS 26 मिळेल?

ज्या आयफोन्समध्ये A13 किंवा त्यापुढील चिप (Chip) आहे, त्यांना iOS 26 अपडेट मिळणार आहे. याचा अर्थ, iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max या मॉडेल्सना हे आगामी अपडेट मिळणार नाही. तसेच, गेल्या वर्षीप्रमाणे, प्रत्येक आयफोनला ‘ॲपल इंटेलिजन्स’ फीचर्स मिळणार नाहीत. तुम्ही फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन आयफोन मॉडेल जाणून घेऊ शकता.

iOS 26 अपडेट मिळणारे आयफोन मॉडेल्स:

  • iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max
  • iPhone SE (2nd generation)
  • iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max
  • iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max
  • iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max
  • iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max
  • iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max
  • iPhone 16e

iOS 26 डेव्हलपर बीटा अपडेट कसे इन्स्टॉल कराल?

  • तुमच्या आयफोनवरून ॲपल डेव्हलपर साइटला (https://developer.apple.com) भेट द्या आणि तुमच्या ॲपल आयडीने (Apple ID) लॉग इन करा.
  • ‘सेटिंग्ज > प्रायव्हसी अँड सिक्युरिटी ‘ मध्ये जाऊन डेव्हलपर मोड सुरू करा.
  • ‘सेटिंग्ज > जनरल > सॉफ्टवेअर अपडेट > बीटा अपडेट्स (Beta Updates)’ येथे जाऊन “iOS 26 Developer Beta” निवडा.
  • “डाउनलोड अँड इन्स्टॉल ” वर टॅप करा आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.