iPhone 17 Launch Date: तुम्ही जर आयफोनचे शौकीन असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अॅपलची आयफोन 17 सीरिज लवकरच (iPhone 17 Launch Date) लाँच होणार आहे.
रिपोर्टनुसार, Apple आपली iPhone 17 सीरिज 9 सप्टेंबर 2025 रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नसली तरी काही रिपोर्टमध्ये नवीन आयफोन सीरिज 9 सप्टेंबर 2025 रोजी लाँच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सामान्यपणे अॅपल किंवा इतर कंपन्या त्यांचे नवीन फोन कधी लाँच करणार आहेत, याची माहिती कॅरियर कंपन्यांना सर्वात आधी मिळते, जेणेकरून ते तयारी करू शकतील. याच कंपनीतील एका अॅरियरने ही तारीख लीक केली असावी असा अंदाज आहे.
यापूर्वी, एका कथित आयफोन 17 प्रो मॅक्सचा फोटोही ऑनलाइन लीक झाला होता. गेल्या वर्षी अॅपल ने आयफोन 16 सीरिज 9 सप्टेंबर रोजीच लाँच केली होती, त्यामुळे 9 सप्टेंबर 2025 ही तारीख खरी वाटत आहे. या फोनसाठी 12 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर (Pre-Order) सुरू होण्याची आणि 19 सप्टेंबरपासून शिपिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन आयफोनची वाट पाहत असाल तर सप्टेंबर महिन्यात तुमची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे.
नवीन iPhone 17 Air चा समावेश होणार
यावेळी अॅपल आयफोन 17 मालिकेत चार नवीन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स या नियमित मॉडेल्ससोबतच एक नवीन मॉडेल आयफोन 17 एअर (iPhone 17 Air) देखील लाँच होऊ शकते. आयफोन 17 एअर हा एक नवीन फॉर्म फॅक्टर असेल, जो सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 25 एजला टक्कर देईल. आयफोन 17 एअर हा आयफोन 17 पेक्षा अधिक स्लिम आणि वजनाने हलका असेल, असे म्हटले जात आहे.