iPhone 17e Price & Features: स्मार्टफोन विश्वातील दिग्गज कंपनी अॅपलने भारतीय ग्राहकांसाठी आपला नवीन आणि स्वस्त दरातील iPhone 17e अधिकृतपणे लाँच केला आहे. गेल्या वर्षीच्या iPhone 16e च्या यशानंतर कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. यामध्ये प्रगत प्रोसेसर आणि मॅगसेफ तंत्रज्ञानाचा समावेश करून बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
iPhone 17e ची प्रमुख वैशिष्ट्ये :
- डिस्प्ले आणि बिल्ड: या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षिततेसाठी ‘सिरॅमिक शील्ड 2’ चा वापर केला आहे, जो फोन पडल्यास तुटण्यापासून अधिक संरक्षण देतो.
- प्रोसेसर: iPhone 17e मध्ये नवीन ‘A19’ चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 3 नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित असून यामुळे फोनची गती आणि कार्यक्षमता कमालीची वाढली आहे. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
- कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आहे, जो हाय-रेजोल्यूशन फोटो आणि 2x लॉसलेस झूमला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा ‘ट्रू डेप्थ’ कॅमेरा दिला आहे, जो फेस आयडीसाठीही काम करतो.
- डिझाइन: फोनची बॉडी अल्युमिनियमपासून बनलेली असून मागच्या बाजूला प्रीमियम ग्लास फिनिश दिले आहे. हा फोन ‘IP68’ रेटिंगसह येत असल्याने पाणी आणि धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.
- मॅगसेफ सपोर्ट: यामध्ये मॅगसेफ तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही मॅग्नेटिक वायरलेस चार्जर, वॉलेट आणि इतर एक्सेसरीज थेट फोनच्या मागे जोडू शकता.
- सॉफ्टवेअर आणि एआय: हा फोन लेटेस्ट आयओएसवर चालतो. यामध्ये नवीन एआय फीचर्स आणि प्रगत सिरी इंटिग्रेशन देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट अनुभव मिळेल.
- बॅटरी आणि चार्जिंग: अॅपलने बॅटरीची नेमकी क्षमता उघड केली नसली तरी, हा फोन पूर्ण दिवसभराचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. यामध्ये युएसबी-सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे.
किंमत आणि उपलब्धता :
भारतात iPhone 17e ची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे, तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 84,900 रुपयांपर्यंत जाते. हा फोन ब्लॅक, पिंक आणि व्हाईट अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना हा फोन 11 मार्च पासून ऑनलाइन आणि ऑफलाईन स्टोअर्समधून खरेदी करता येईल.











