Home / लेख / दिवाळीला लॅपटॉप घेताय? Apple ने लाँच केला पॉवरफुल MacBook Pro; फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

दिवाळीला लॅपटॉप घेताय? Apple ने लाँच केला पॉवरफुल MacBook Pro; फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

Apple MacBook Pro: टेक कंपनी Apple ने M5 चिपसेटसह सज्ज असलेला 14-इंच मॅकबुक प्रो (Apple MacBook Pro) बाजारात आणला आहे....

By: Team Navakal
apple macbook pro 14-inch

Apple MacBook Pro: टेक कंपनी Apple ने M5 चिपसेटसह सज्ज असलेला 14-इंच मॅकबुक प्रो (Apple MacBook Pro) बाजारात आणला आहे. आकर्षक लिक्विड रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, macOS Tahoe आणि बॅकलिट कीबोर्डसारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह आलेला हा लॅपटॉप विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्कफ्लोसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

Apple MacBook Pro: नवीन M5 चिपसेट आणि AI क्षमता

M5 चिपमुळे मॅकबुक प्रोची परफॉर्मन्स क्षमता वाढली आहे. M1 चिपच्या तुलनेत हा लॅपटॉप 6 पट जलद आणि M4 चिपच्या तुलनेत 3.5 पट जलद AI परफॉर्मन्स देतो, असा कंपनीचा दावा आहे. ऑन-डिव्हाइस मोठे भाषिक मॉडेल चालवण्यासाठी ही चिप सक्षम आहे.

Apple MacBook Pro: 14-इंच चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स:

  • डिस्प्ले: 14.2-इंच लिक्विड रेटिना एक्सडीआर डिस्प्ले.
  • रिझोल्यूशन: 3024×1964 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट.
  • ब्राइटनेस: 1,600 nits पीक ब्राइटनेस आणि 1,000 nits सस्टेन्ड ब्राइटनेस.
  • प्रोसेसर: M5 चिपसेट (4 परफॉर्मन्स कोर, 6 एफिशियन्सी कोर आणि 10-कोर जीपीयू)
  • न्यूरल इंजिन: 16-कोर न्यूरल इंजिन आणि प्रत्येक कोरमध्ये न्यूरल ॲक्सिलरेटर.
  • मेमरी/स्टोरेज: 16GB/24GB मेमरी आणि 512GB/1TB स्टोरेज पर्यायांचा सपोर्ट.
  • कॅमेरा/ऑडिओ: व्हिडिओ कॉलसाठी 12MP सेंटर स्टेज कॅमेरा, सिक्स-स्पीकर साउंड सेटअप आणि स्पेशियल ऑडिओ सपोर्ट.
  • सॉफ्टवेअर: macOS Tahoe सह Apple Intelligence चा सपोर्ट.
  • बॅटरी लाइफ: 24 तासांचा बॅटरी बॅकअप (M4 च्या 22 तासांपेक्षा अधिक).

MacBook Pro 14-inch ची किंमत

नवीन मॅकबुक प्रो दोन रंगांमध्ये (स्पेस ब्लॅक आणि सिल्व्हर) उपलब्ध आहे. याची किंमत खालीलप्रमाणे आहे:

  • 16GB RAM/512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,69,900 रुपये आहे.
  • 16GB RAM/1TB SSD मॉडेलची किंमत 1,89,900 रुपये आहे.
  • 24GB RAM/1TB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,09,900 रुपये आहे.

याची प्री-ऑर्डर सुरू झाली असून, 22 ऑक्टोबरपासून Apple च्या वेबसाइट आणि सर्व अधिकृत विक्रेत्यांकडून हा लॅपटॉप खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Apple MacBook Pro: भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार? मोदींचे नाव घेत ट्रम्प यांचा मोठा दावा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या