Home / लेख / जिकडे तिकडे ‘या’ भारतीय ॲपचीच चर्चा; WhatsApp पेक्षाही मिळतात खास फीचर्स

जिकडे तिकडे ‘या’ भारतीय ॲपचीच चर्चा; WhatsApp पेक्षाही मिळतात खास फीचर्स

Arattai App: जगभरातील कोट्यवधी युजर्सच्या पसंतीस उतरलेल्या WhatsApp मेसेजिंग ॲपला आता भारतीय बनावटीचे एक ॲप टक्कर देत आहे. झोहो (Zoho)...

By: Team Navakal
Arattai App

Arattai App: जगभरातील कोट्यवधी युजर्सच्या पसंतीस उतरलेल्या WhatsApp मेसेजिंग ॲपला आता भारतीय बनावटीचे एक ॲप टक्कर देत आहे. झोहो (Zoho) कंपनीने विकसित केलेले हे ॲप ‘Arattai’ या नावाने ओळखले जात आहे, ज्याला सोशल मीडियावर ‘WhatsApp Killer’ म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे, डेटा सुरक्षा, जाहिरातमुक्त अनुभव आणि नवीन उपयुक्त फीचर्समुळे हे ॲप सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर सध्या या अॅपचीच चर्चा आहे.

जाणून घ्या, WhatsApp मध्येही नसलेले Arattai ॲपचे ते 5 महत्त्वपूर्ण फीचर्स:

ॲड-फ्री आणि सुरक्षित डेटा स्टोरेज

Arattai ॲपची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ते पूर्णपणे जाहिरातमुक्त आहे. अलीकडे WhatsApp च्या ‘अपडेट्स’ टॅबमध्ये जाहिराती दिसू लागल्या असताना, Arattai युजर्सना जाहिरातमुक्त अनुभव देण्याचे वचन दिले आहे. शिवाय, युजर्सचा संपूर्ण डेटा भारतामध्येच स्टोअर केला जाईल आणि तो सुरक्षित राहील. तसेच, युजर डेटाचा वापर टार्गेटेड जाहिरातींसाठी केला जाणार नाही, अशी हमी कंपनीने दिली आहे.

पॉकेट पर्सनल क्लाउड स्टोरेज

महत्त्वाची माहिती किंवा नोट्स सेव्ह करण्यासाठी WhatsApp मध्ये स्वतःलाच मेसेज पाठवण्याचा पर्याय वापरावा लागतो. पण Arattai मध्ये यापेक्षा उत्तम ‘पॉकेट’ नावाचे फीचर आहे. हे फीचर पर्सनल क्लाउड स्टोरेज म्हणून काम करते, जिथे युजर्स मेसेज, मीडिया आणि इतर आवश्यक फाईल्स एकाच ठिकाणी सुरक्षितपणे सेव्ह आणि शेअर करू शकतात.

‘मेन्शन्स’ फीचर्स

WhatsApp मध्ये एखाद्या मेसेजमध्ये तुम्हाला ‘मेन्शन’ केले तरी ते सर्व मेसेज एकाच ठिकाणी पाहण्याची सोय नसते. यावर उपाय म्हणून, Arattai ॲपमध्ये ‘मेन्शन्स’ नावाचा एक स्वतंत्र सेक्शन दिले आहे. यामुळे तुम्हाला टॅग केलेले सर्व मेसेज एकाच ठिकाणी दिसतात, ज्यामुळे कोणतीही महत्त्वाची चर्चा किंवा माहिती तुमच्याकडून मिस होत नाही.

‘मीटिंग्स’ साठी विशेष पर्याय

हे ॲप केवळ मेसेजिंगपुरते मर्यादित नाही. यात व्हिडिओ कॉलिंग व्यतिरिक्त एक वेगळा ‘मीटिंग्स’ पर्याय उपलब्ध आहे. हे फीचर थेट Zoom आणि Google Meet सारख्या प्लॅटफॉर्म्सना टक्कर देते. युजर्स या माध्यमातून सहजपणे मीटिंग्ज शेड्यूल करू शकतात आणि मागील मीटिंग्सचा इतिहास देखील तपासू शकतात.

AI चा सक्तीचा वापर नाही

WhatsApp ची मूळ कंपनी Meta आता आपल्या सेवांमध्ये AI फिचर्सचा सक्तीचा वापर करत आहे. WhatsApp मध्ये Meta AI अनेक ठिकाणी आढळते आणि ते डिसेबल करण्याचा पर्यायही नाही. याउलट, Arattai ॲपमध्ये सध्या कोणतेही बिल्ट-इन किंवा युजरवर लादलेले AI टूल नाही.

हे देखील वाचा – आजपासून ‘हे’ 15 मोठे नियम बदलणार! एलपीजीपासून ते रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत थेट तुमच्या खिशावर परिणाम

    Web Title:
    For more updates: , , , stay tuned with Navakal
    Topics:
    संबंधित बातम्या