Home / लेख / फॅमिलीसाठी बेस्ट आहे ‘Ather Rizta’ इलेक्ट्रिक स्कूटर! 159 किमीची रेंज आणि जबरदस्त फीचर्स; किंमत लवकरच वाढणार

फॅमिलीसाठी बेस्ट आहे ‘Ather Rizta’ इलेक्ट्रिक स्कूटर! 159 किमीची रेंज आणि जबरदस्त फीचर्स; किंमत लवकरच वाढणार

Ather Rizta: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना, Ather Energy ची Ather Rizta ही स्कूटर सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली...

By: Team Navakal
Ather Rizta
Social + WhatsApp CTA

Ather Rizta: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना, Ather Energy ची Ather Rizta ही स्कूटर सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती ठरत आहे. केवळ लूकच नाही तर ताकद आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ही स्कूटर अत्यंत प्रगत आहे. दैनंदिन वापर आणि कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन या स्कूटरची रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात भारी मानली जाते.

Ather Rizta ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • दोन बॅटरी पर्याय: ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार २.९ kWh आणि ३.७ kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये ही स्कूटर निवडता येते.
  • दमदार रेंज: एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १२३ किमी ते १५९ किमीपर्यंतचा प्रवास सहज पूर्ण करते, ज्यामुळे वारंवार चार्जिंगचे टेन्शन राहत नाही.
  • प्रचंड स्टोरेज क्षमता: या स्कूटरमध्ये ३४ लिटरचे मोठे अंडरसीट स्टोरेज देण्यात आले आहे, जिथे तुम्ही आरामात हेल्मेट किंवा किराणा सामान ठेवू शकता.
  • फास्ट चार्जिंग: व्यस्त जीवनशैलीसाठी यात फास्ट चार्जिंगचा पर्याय आहे. केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगवर ही स्कूटर ३० किमीपर्यंत धावू शकते.
  • बॅटरी सुरक्षा आणि वॉरंटी: यातील बॅटरीला IP67 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ती पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहते. तसेच कंपनी बॅटरीवर ८ वर्षांची दीर्घकालीन वॉरंटी देत आहे.
  • स्मार्ट तंत्रज्ञान: यात ७ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले असून तो ब्लूटूथ, नेविगेशन आणि कॉल-मैसेज अलर्टला सपोर्ट करतो.
  • रायडिंग मोड्स: सुरक्षित प्रवासासाठी यात ऑटो होल्ड, रिव्हर्स मोड आणि विविध रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
  • आरामदायी प्रवास: खराब रस्त्यांवरही झटका बसू नये यासाठी समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.

सध्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,१४,५४७ रुपयांपासून सुरू होते. मात्र, १ जानेवारी २०२६ पासून या किमतीत ३००० रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक स्कूटर सध्याच्या दरात खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे.

हे देखील वाचा –  WhatsApp Ghost Pairing म्हणजे काय? तुमच्या नकळत कोणीतरी चोरून वाचतंय तुमचे चॅट्स; ‘या’ एका चुकीमुळे व्हाल कंगाल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या