Bajaj Chetak 3503 Launched | देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने आपला लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक (Bajaj Chetak) आणखी परवडणाऱ्या व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. चेतक 35 (Chetak 35) सिरीजअंतर्गत सादर करण्यात आलेल्या नव्या चेतक 3503 (Chetak 3503) व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत फक्त ₹1,09,500 इतकी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर याच सिरीजमधील 3501 आणि 3502 पेक्षा अधिक स्वस्त आहे.
20 हजार रुपयांनी स्वस्त
गेल्या वर्षी लाँच झालेल्या चेतक 3501 आणि 3502 व्हेरियंट्सच्या तुलनेत, नवीन चेतक 3503 जवळपास ₹20,000 ने स्वस्त आहे. त्यामुळे बजाजची ही नवीन ऑफर किफायतशीर दरात एक उत्तम पर्याय म्हणून समोर येते आहे.
डिझाइन सारखे, पण फीचर्स थोडे कमी
चेतक 3503 मध्ये त्याच चेसिसचा वापर करण्यात आला आहे, जो महागड्या मॉडेल्समध्ये असतो. परिणामी, स्कूटरचे लुक आणि अंडर-सीट स्टोरेज (35 लिटर) सारखेच आहेत. मात्र, काही उच्च-श्रेणी फीचर्स वगळल्याने ही स्कूटर किफायतशीर बनली आहे.
बॅटरी आणि रेंज
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक (battery range) दिला आहे. स्कूटर सिंगल चार्जमध्ये 155 किमी पर्यंत धावते. टॉप स्पीड 63 किमी/तास इतका आहे. इको आणि स्पोर्ट्स हे दोन राइडिंग मोड्ससह हिल-होल्ड असिस्ट आणि फुल मेटल बॉडीसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.
या व्हेरियंटमध्ये कलर LCD डिस्प्ले व ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहेत, मात्र डिस्क ब्रेक ऐवजी ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि सीक्वेन्शियल इंडिकेटर यात दिलेले नाहीत. चार्जिंगसाठी 0 ते 80% पर्यंत सुमारे 3 तास 25 मिनिटे लागतात.
रंग आणि उपलब्धता
चेतक 3503 चार आकर्षक रंगांमध्ये येतो – इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक, सायबर व्हाइट आणि मॅट ग्रे. बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि डीलरशिपवर पर्याय उपलब्ध असून, डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
चेतक 3503 हे चेतक 35 सिरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. मात्र, बजाज चेतक 29 सिरीजही विक्रीसाठी आहे, ज्यातील चेतक 2903 हा आणखी किफायतशीर पर्याय आहे. त्याची किंमत ₹98,498 असून त्यात 2.9kWh बॅटरी पॅक दिला आहे जो 123 किमीची रेंज देतो.