Bank Jobs | बँक ऑफ बडोदात 500 पदांची मोठी भरती! अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा माहिती

Bank of Baroda Recruitment 2025 |

Bank of Baroda Recruitment 2025 | बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Vacancy) ऑफिस असिस्टंट संवर्गातील तब्बल 500 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी नोकरीची संधी आहे. अर्ज प्रक्रिया बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (bankofbaroda.in) 3 मेपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 मे आहे.

रिक्त पदांचा तपशील व पात्रता:

या भरतीअंतर्गत शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या तारखेनुसार 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा (Online Exam) व त्यानंतर स्थानिक भाषेच्या चाचणीद्वारे केली जाईल. परीक्षेत एकूण 100 गुण असून, प्रत्येक विभागात किमान गुण मिळवणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादी हाच निकष असेल.

अर्ज शुल्क:

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹600 आहे. तर SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि महिलांसाठी ₹100 शुल्क आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

  • bankofbaroda.in या वेबसाइटला भेट द्या.
  • “Apply” पर्यायावर क्लिक करून नोंदणी करा.
  • वैयक्तिक माहिती भरून खाते तयार करा.
  • लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून अंतिम सबमिशन करा.

या भरती प्रक्रियेमुळे देशभरातील उमेदवारांना सरकारी बँकेत स्थिर नोकरीची संधी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असल्यामुळे या पदांना चांगली प्रतिष्ठा व भविष्याची सुरक्षितता आहे.