Moringa Soup for Winter: भारतीय स्वयंपाकघरात शेवग्याला विशेष महत्त्व आहे. थंडीच्या दिवसात जेव्हा पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात, तेव्हा शेवग्याचा पाला आरोग्यासाठी वरदान ठरतो. भारतात गेल्या 4,000 वर्षांपासून शेवग्याचा वापर आहारात केला जात आहे. विशेषतः हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या पाल्याचे सूप पिण्याची जुनी परंपरा आहे.
हिवाळ्यात शेवग्याचे सूप पिण्याचे 5 मोठे फायदे
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते: शेवग्याच्या पाल्यामध्ये नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे थंडीतील संसर्ग आणि खोकल्यापासून शरीराचे रक्षण करतात.
- ऊर्जा टिकवून ठेवते: या सूपमधील लोह आणि पोषक घटक हिवाळ्यातील थकवा दूर करून शरीरात उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतात.
- पचन सुधारते: थंडीत पचनसंस्था मंदावते. शेवग्यातील फायबरमुळे पचन हलके होते आणि पोटाचे विकार दूर राहतात.
- डिटॉक्सिफिकेशन: हे सूप यकृताची कार्यक्षमता वाढवून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
- सर्वांसाठी योग्य: हे सूप पचायला हलके असल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण रात्रीच्या वेळी किंवा सकाळी याचा आनंद घेऊ शकतात.
A Simple Way To Make Drumstick Soup: शेवग्याच्या पाल्याचे सूप कसे बनवावे?
साहित्य (2 लोकांसाठी):
- 1 कप ताजा शेवग्याचा पाला
- 1 शेवग्याची शेंग (तुकडे केलेली)
- 1 छोटा कांदा (चिरलेला)
- 3 लसूण पाकळ्या (ठेचलेल्या)
- 1/2 टीस्पून मिरे पूड
- 1/2 टीस्पून जिरे
- 1/4 टीस्पून हळद
- 3 कप पाणी
- 1 टीस्पून तूप किंवा तेल
- चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस
कृती:
- एका भांड्यात तूप गरम करून त्यात जिरे टाका.
- जिरे तडतडल्यावर त्यात कांदा आणि लसूण घालून गुलाबी होईपर्यंत परता.
- आता त्यात शेवग्याच्या शेंगेचे तुकडे, हळद, मिरे पूड आणि मीठ घालून मिक्स करा.
- 3 कप पाणी घालून 10 ते 12 मिनिटे शेंगा शिजेपर्यंत उकळा.
- शेवटी स्वच्छ केलेला शेवग्याचा पाला घालून अजून 5 मिनिटे शिजवा.
- तयार मिश्रण हलके मॅश करा, हवे असल्यास गाळून घ्या आणि वरून लिंबाचा रस टाकून गरमागरम सर्व्ह करा.
हिवाळ्यातील थंडीत हे सूप केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ म्हणून काम करते. नवीन वर्षाची सुरुवात एका आरोग्यदायी सवयीने करण्यासाठी हे सूप नक्की ट्राय करा.
हे देखील वाचा – Healthy Breakfast: चक्क नाश्त्यात खा ‘चॉकलेट केक’! फक्त 7 साहित्यात तयार होणारी ही हाय-प्रोटिन रेसिपी एकदा नक्की ट्राय करा












