Bermuda Triangle Mysterious Disappearances Theory in Marathi: बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) हे जगातील सर्वात रहस्यमयी जागांपैकी एक मानले जाते. फ्लोरिडा, बर्म्युडा आणि ग्रेटर अँटिल्स यांच्यातील समुद्राचा एक भाग असलेल्या या भागात आतापर्यंत 50 हून अधिक जहाजे आणि 20 विमाने गायब झाली आहेत.
अनेकांनी या भागात अचानक जहाजे व विमाने गायब होण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी काही कारणे देखील सांगितली, मात्र ठोस पुरावा सापडला नाही. आता आणखी एका वैज्ञानिकांने बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा जावा केला आहे.
एका ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकाने हे कोडे सोडवले आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक कार्ल क्रुझेलनिस्की यांचे म्हणणे आहे की यामागील स्पष्टीकरण रहस्यमय नाही, तर ते आकडेवारी, खराब हवामानआणि मानवी चुकाआहे. त्यांच्या या सिद्धांताला यू.एस. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA), लॉइड्स ऑफ लंडन आणि यू.एस. कोस्ट गार्ड यांनीही दुजोरा दिला आहे.
NOAAने 2010 मध्ये म्हटले होते की, “इतर कोणत्याही मोठ्या, प्रवासाच्या मार्गावरील समुद्राच्या तुलनेत बर्म्युडा ट्रँगलमध्ये रहस्यमय घटना अधिक घडतात, याचा कोणताही पुरावा नाही.” क्रुझेलनिस्की 2017 पासून हेच सांगत आहेत की, या भागातून होणाऱ्या प्रचंड वाहतुकीमुळे आणि अवघड नेव्हिगेशनमुळे येथे अपघात घडतात.
NOAAने असेही म्हटले आहे की, बहुतेक घटना नैसर्गिक कारणांमुळे घडतात. गल्फ स्ट्रीमच्याहवामानातील अचानक बदल, कॅरिबियन बेटांची गुंतागुंतीची रचना आणि क्वचितच होणारे चुंबकीय बदल, ज्यामुळे दिशादर्शक यंत्रातगोंधळ निर्माण होतो, ही त्यामागील कारणे आहेत. अगदी 1945 मधील पाच यू.एस. नेव्ही बॉम्बर्सच्या गायब होण्यामागेही खराब हवामान, नेव्हिगेशनल चुका किंवा दोन्ही कारणे असू शकतात.
बॅस स्ट्रेट ट्रँगल, जो ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमी आणि टास्मानिया (Tasmania) यांच्यातील पाण्याचा एक धोकादायक पट्टा आहे, येथेही अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत.
तरीही, समुद्री राक्षस आणि हरवलेल्या संस्कृतीची कथा आकडेवारी आणि हवामानशास्त्रापेक्षा अधिक मनोरंजक असल्याने यावर अनेक पुस्तके, टीव्ही शो आणि चित्रपट आजही बनवले जातात.
आतापर्यंत बर्म्युडा ट्रँगल भागात अनेक जहाजे व विमाने गायब झाली आहे. विशेष म्हणजेच त्यांचा कधीच शोध लागला नाही. काही दिवसांपूर्वीच एक विमान गायब झाल्याची घटना समोर आली आहे.