Home / लेख / AC Offers 2026: उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वीच घरी आणा नवीन AC! खूपच कमी बजेटमध्ये टॉप ब्रँड्सवर मिळतेय ‘भारी’ सूट

AC Offers 2026: उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वीच घरी आणा नवीन AC! खूपच कमी बजेटमध्ये टॉप ब्रँड्सवर मिळतेय ‘भारी’ सूट

AC Offers 2026: काही दिवसांच्या पावसानंतर आता पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे घरामध्ये गारवा टिकवून ठेवण्यासाठी...

By: Team Navakal
AC Offers 2026
Social + WhatsApp CTA

AC Offers 2026: काही दिवसांच्या पावसानंतर आता पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे घरामध्ये गारवा टिकवून ठेवण्यासाठी एअर कंडिशनिंग आता गरज बनली आहे. जर तुम्ही या उन्हाळ्यात नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर 1.5 टन एसीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही बजेटमध्ये प्रीमियम ब्रँड्स घरी आणू शकता.

30,000 रुपयांच्या बजेटमधील सर्वोत्तम पर्याय :

1. Godrej 1.5 Ton 3 Star Split Inverter AC (2025 Model)

हा एसी फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मूळ किंमत जास्त असली तरी सध्या सेलमध्ये तो 28,490 रुपयांना मिळत आहे. विविध बँकांच्या क्रेडिट कार्डवर यावर 3,000 ते 3,500 रुपयांपर्यंतची मोठी सवलत दिली जात आहे, ज्यामुळे ही एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ डील ठरते.

2. Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split AC (5 in 1 Convertible)

लॉइडचा हा कन्व्हर्टिबल एसी 31,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, एचडीएफसी किंवा एसबीआय बँक कार्डवरील 1,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा एसी तुम्हाला 29,990 रुपयांना पडू शकतो. याचे ‘5 इन 1’ फीचर ग्राहकांना अधिक सोयीचे पडते.

3. Voltas 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

ॲमेझॉनवर वोल्टासचा हा एसी सध्या 30,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. मात्र, एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या ऑफरमुळे याची किंमत केवळ 29,490 रुपयांपर्यंत खाली येते. भारतातील विश्वसनीय ब्रँड असल्याने याला अधिक पसंती मिळत आहे.

4. Hisense 1.5 Ton 3 Star Split Inverter AC (2025 Model)

फ्लिपकार्टवर या एसीवर सध्या 32% पर्यंत सूट मिळत आहे. सर्व ऑफर्सनंतर तुम्ही हा एसी फक्त 28,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला 1,500 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल.

5. Whirlpool 1.5 Ton 3 Star Magicool Inverter AC

30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हा देखील एक शानदार पर्याय आहे. ॲमेझॉनवर हा एसी सध्या 29,240 रुपयांना उपलब्ध आहे. अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयवर खरेदी केल्यास तुम्हाला 1,500 रुपयांची अतिरिक्त बचत करता येईल.

उन्हाळा अधिक तीव्र होण्यापूर्वी या डील्सचा फायदा घेणे फायदेशीर ठरेल, कारण मागणी वाढल्यास किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या