Home / लेख / 55 inch Smart TV Offers : मोठी स्क्रीन, कमी किंमत! फ्लिपकार्टवर 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळतोय निम्म्या किंमतीत

55 inch Smart TV Offers : मोठी स्क्रीन, कमी किंमत! फ्लिपकार्टवर 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळतोय निम्म्या किंमतीत

55 inch Smart TV Offers : आजच्या काळात घराघरात मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही लावण्याची क्रेझ वाढली आहे. मग तो आवडीचा...

By: Team Navakal
55 inch Smart TV Offers
Social + WhatsApp CTA

55 inch Smart TV Offers : आजच्या काळात घराघरात मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही लावण्याची क्रेझ वाढली आहे. मग तो आवडीचा चित्रपट असो वा क्रिकेट सामना, मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

मात्र, अनेकांना बजेटमुळे मोठी स्क्रीन घेताना विचार करावा लागतो. अशा ग्राहकांसाठी ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टने जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. 55 इंचाचे स्मार्ट टीव्ही आता तुमच्या बजेटमध्ये सहज बसू शकतात.

1. iFFALCON 55 इंच Ultra HD 4K स्मार्ट टीव्ही

बजेटमध्ये सर्वात मोठा टीव्ही हवा असेल तर iFFALCON हा एक उत्तम पर्याय आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीवर तब्बल 62% पर्यंत सूट मिळत आहे.

  • किंमत: 66,599 रुपयांचा हा टीव्ही आता केवळ 24,999 रुपयांत उपलब्ध आहे.
  • वैशिष्ट्ये: यात 60Hz रिफ्रेश रेटसह अल्ट्रा एचडी 4K डिस्प्ले मिळतो. दर्जेदार आवाजासाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह 24W चे दोन स्पीकर्स दिले आहेत. हा गुगल टीव्ही असून नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार आणि यूट्यूबसारखे अ‍ॅप्स सहज चालतात. यावर 1 वर्षाची वॉरंटी देखील आहे.

2. Thomson 55 इंच Ultra HD 4K स्मार्ट टीव्ही

थॉमसनच्या या टीव्हीवर 58% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. ज्यांना पिक्चर क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नको आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

  • किंमत: हा टीव्ही सेलमध्ये तुम्ही 25,499 रुपयांना खरेदी करू शकता.
  • वैशिष्ट्ये: यात 4K QLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामुळे रंगांची स्पष्टता अधिक चांगली मिळते. आवाजासाठी यात शक्तिशाली 40W चे आउटपुट आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट आहे. यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट्स देण्यात आले आहेत.

3. Xiaomi F Pro 55 इंच Ultra HD 4K स्मार्ट टीव्ही

शाओमीचा हा टीव्ही 2025 एडिशन असून तो अत्यंत प्रगत फीचर्सनी सज्ज आहे. यावर 48% डिस्काउंट मिळत आहे.

  • वैशिष्ट्ये: हा टीव्ही FireTV OS वर चालतो. यात QLED डिस्प्ले आणि 34W चे स्पीकर्स आहेत, जे क्रिस्टल क्लियर पिक्चर आणि साऊंड क्वालिटी देतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्लूटूथचे लेटेस्ट फीचर्स दिले आहेत.
  • किंमत: या टीव्हीची मूळ किंमत 62,999 रुपये असली तरी तो 32,999 रुपयांना उपलब्ध आहे.
  • बँक ऑफर: जर तुम्ही ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले, तर 1,750 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे हा टीव्ही तुम्हाला 31,249 रुपयांत पडेल.
Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या