Best 5G Phones Under 10000: एकेकाळी ५जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता १० हजार रुपयांच्या बजेटमध्येही उत्तम ५जी फोन्स उपलब्ध झाले आहेत.
जर तुम्हाला सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि वेगवान इंटरनेटसाठी स्वस्त पण मस्त फोन हवा असेल, तर सध्या बाजारपेठेत काही जबरदस्त पर्याय आहेत. Amazon आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ‘या’ निवडक ५जी फोन्सवर तुम्ही नक्कीच विचार करू शकता.
बजेटमध्ये बसणारे सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स:
- Samsung Galaxy M06 5G: विश्वासार्ह ब्रँडच्या शोधात असणाऱ्यांसाठी सॅमसंगचा हा फोन ९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० हा पॉवरफुल प्रोसेसर असून ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो.
- Lava Bold N1 5G: हा या यादीतील सर्वात परवडणारा ५जी फोन आहे. अवघ्या ८,९९८ रुपयांत उपलब्ध असलेल्या या फोनमध्ये ५०००mAh ची मोठी बॅटरी आणि १३ मेगापिक्सलचा एआय (AI) कॅमेरा देण्यात आला आहे.
- itel ZENO 5G AI: ज्यांना जास्त रॅम हवी आहे त्यांच्यासाठी हा ९,९९९ रुपयांचा फोन उत्तम आहे. यामध्ये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मिळते. तसेच १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा डिस्प्ले हा याचा मोठा प्लस पॉईंट आहे.
- AI+ Nova 5G: हा स्मार्टफोन ९,४९० रुपयांना मिळत असून यामध्ये ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजचा पर्याय दिला आहे. ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीमुळे हा एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ फोन ठरतो.
- Lava Shark 5G: ९,४९९ रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या फोनमध्ये ६.७५ इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात युनिसॉक टी७६५ प्रोसेसर असून ५जी कनेक्टिव्हिटीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
तुम्ही गेमिंगसाठी फोन शोधत असाल किंवा केवळ दैनंदिन वापरासाठी, वरील सर्व फोन्स १० हजार रुपयांच्या मर्यादेत ५जी चा अनुभव देण्यासाठी सक्षम आहेत.
हे देखील वाचा – Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप! नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? मुलाकडे देणार मोठी जबाबदारी










