Home / लेख / Best 5G Smartphones under 20000: नवीन फोन घ्यायचाय? पाहा 20 हजार रुपयांच्या बजेटमधील ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स

Best 5G Smartphones under 20000: नवीन फोन घ्यायचाय? पाहा 20 हजार रुपयांच्या बजेटमधील ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स

Best 5G Smartphones under 20000 : सध्या स्मार्टफोनच्या दुनियेत दर काही दिवसांनी नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशा वेळी कमीत कमी...

By: Team Navakal
Best 5G Smartphones under 20000
Social + WhatsApp CTA

Best 5G Smartphones under 20000 : सध्या स्मार्टफोनच्या दुनियेत दर काही दिवसांनी नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशा वेळी कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फीचर्स मिळवणं हे प्रत्येक ग्राहकाचं स्वप्न असतं. जर तुमचं बजेट २० हजार रुपयांच्या आसपास असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि पॉवरफुल ५G फोन्सची यादी तयार केली आहे.

तुमच्या बजेटमध्ये बसणारे सर्वोत्तम ५G फोन्स:

1. Realme P3 Pro 5G

रियलमीचा हा फोन अशा लोकांसाठी आहे ज्यांना वेगवान परफॉर्मन्स हवा आहे. यात क्वालकॉमचा शक्तिशाली Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. ६.८३ इंचाचा मोठा डिस्प्ले आणि ६०००mAh ची बॅटरी या फोनला अधिक खास बनवते. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो.

2. Lava Play Ultra

भारतीय कंपनी लावाचा हा स्मार्टफोन सध्या परदेशी ब्रँड्सना कडवी झुंज देतोय. अमेझॉनवर हा फोन १५,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. यात ६४ मेगापिक्सेलचा जबरदस्त रिअर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळतो. ५०००mAh बॅटरीसह हा फोन ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरतो.

3. Motorola Moto G67 Power 5G

ज्यांना वारंवार चार्जिंगचे टेन्शन नको आहे, त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट आहे. यात ७०००mAh ची प्रचंड मोठी बॅटरी असून ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen2 चिपसेट असून तो अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुमारे १५,९०० रुपयांना उपलब्ध आहे.

4. Nothing Phone (3a) Lite

जर तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल आणि तुम्ही बजेटमध्ये थोडे वाढ करू शकत असाल, तर २१,९९९ रुपयांचा हा नथिंग फोन उत्तम आहे. बँक ऑफर्स वापरून हा फोन २० हजारांच्या घरात मिळू शकतो. यात MediaTek Dimensity 7300 Pro प्रोसेसर आणि ८GB रॅम असून नथिंगची सिग्नेचर डिझाईन लक्ष वेधून घेते.

5. Poco M8 5G

पोकोचा हा ५G फोन १८,९९९ रुपयांच्या किमतीत एक चांगला ऑलराउंडर पर्याय आहे. यात ६.७७ इंचाचा डिस्प्ले आणि ५५२०mAh ची बॅटरी मिळते. Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसरमुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगमध्ये हा फोन चांगली साथ देतो. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या