Best 7000mAh Battery Smartphones: स्मार्टफोनचा वापर आपण दिवसभर करतो. त्यामुळे चांगला बॅटरी बॅकअप असणे गरजेचे आहे. बाजारात आता 7000mAh बॅटरीसह येणारे स्मार्टफोन्स देखील उपलब्ध आहेत. हे फोन एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस सहज वापरू शकता.
तुम्ही देखील 7000mAh बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल, तर अशाच फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
realme 15 5G
रियलमीने (realme) नुकतेच दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, त्यापैकी एक realme 15 5G आहे. कंपनी सध्या हा फोन 25,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे. यात मीडियाटेक 7300+ प्रोसेसरसह 7000mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
OPPO K13 5G
OPPO K13 5G ची किंमत फक्त 17,999 रुपये आहे. यात 7000mAh ची बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 चिपसेट आहे. तसेच, यात एक चांगली कूलिंग सिस्टीम दिली आहे, ज्यामुळे फोन गरम होत नाही. यावर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचाही फायदा घेता येईल.
vivo T4 5G
वीवो कंपनीचा (vivo) हा 5G फोनही खूप शानदार आहे, यात 7300mAh ची मोठी बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फ्लिपकार्टवर हा फोन तुम्ही फक्त 21,999 रुपयांना खरेदी करू शकता. काही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंटही मिळत आहे.
iQOO Z10 5G
iQOO कंपनीचा हा फोन 7300mAh च्या मोठ्या बॅटरीसह येतो. यात 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देखील आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून 20,939 रुपयांना खरेदी करू शकता. यावर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्यात फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, जुना फोन एक्सचेंज केल्यास एक चांगली एक्सचेंज ऑफरही मिळेल.
OnePlus Nord CE5 5G
वनप्लसने (OnePlus) नुकताच नॉर्ड सीरिजअंतर्गत (Nord Series) हा शानदार 5G फोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्येही तुम्हाला 7100mAh ची मोठी बॅटरी मिळते आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तुम्ही हा फोन सध्या 24,133 रुपयांना खरेदी करू शकता आणि बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता.