Home / लेख / आता थिएटरचा अनुभव घरीच! 65 इंच Smart TV वर मोठी सवलत; सॅमसंग आणि सोनीसह ‘हे’ ब्रँड्स झाले स्वस्त

आता थिएटरचा अनुभव घरीच! 65 इंच Smart TV वर मोठी सवलत; सॅमसंग आणि सोनीसह ‘हे’ ब्रँड्स झाले स्वस्त

65 inch Smart TV Offers 2026 : जर तुम्ही तुमच्या घरासाठी मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल,...

By: Team Navakal
65 inch Smart TV Offers 2026
Social + WhatsApp CTA

65 inch Smart TV Offers 2026 : जर तुम्ही तुमच्या घरासाठी मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सध्या 65 इंच स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स सुरू आहेत. यामध्ये सोनी, सॅमसंग आणि एलजी यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या प्रीमियम मॉडेल्सवर मोठी सवलत, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बेनिफिट्स दिले जात आहेत.

स्मार्ट टीव्हीवरील सर्वोत्तम डील्स

Philips 8100 Series QLED Google TV: फिलिप्सचा हा टीव्ही सध्या ॲमेझॉनवर 22% डिस्काउंटसह 45,999 रुपयांना मिळत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या कार्डावर 1,500 रुपयांची अतिरिक्त सवलत ग्राहकांना मिळू शकते.

SONY Bravia 2 4K LED TV: गुणवत्तेसाठी ओळखला जाणारा सोनीचा हा टीव्ही फ्लिपकार्टवर 45% डिस्काउंटनंतर केवळ 69,990 रुपयांना मिळत आहे. बँक कार्ड्स किंवा युपीआय पेमेंटवर 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करण्याची संधी असून नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

Samsung Crystal 4K Infinity Vision: सॅमसंगचा हा टीव्ही 28% सवलतीनंतर 60,990 रुपयांना उपलब्ध आहे. विविध बँक कार्ड्स किंवा युपीआय पेमेंटवर कंपनी 3,000 रुपयांपर्यंतचा थेट डिस्काउंट आणि 6,650 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर देत आहे.

Hisense E6N Series Google TV: हायसेन्सच्या या टीव्हीवर ॲमेझॉन 48% पर्यंत मोठी सूट देत असून त्याची किंमत 41,999 रुपये आहे. बँक कार्ड्स वापरल्यास 1,500 रुपयांची वाढीव सवलत ग्राहकांना घेता येईल.

realme TechLife QLED 4K TV: कमी बजेटमध्ये मोठा टीव्ही हवा असल्यास रियलमीचा हा पर्याय उत्तम आहे. यावर चक्क 54% सूट मिळत असून तो केवळ 38,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय आकर्षक बँक कॅशबॅक देखील दिला जात आहे.

LG UA82 Series LED TV: एलजीचा हा प्रीमियम टीव्ही 41% सवलतीनंतर 62,990 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी आणि आयडीएफसी बँक कार्डावर 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट आणि नो-कॉस्ट ईएमआयची सोय करण्यात आली आहे.

हे देखील वाचा –  Pune Election AB Form Controversy : निवडणुकीचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! उमेदवारी अर्जावरून राडा; चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या