Home / लेख / Best TWS Earbuds : 2,000 रुपयांच्या आत मिळतायत ‘हे’ दमदार गेमिंग इयरबड्स; बॅटरी आणि साऊंडमध्ये नंबर 1

Best TWS Earbuds : 2,000 रुपयांच्या आत मिळतायत ‘हे’ दमदार गेमिंग इयरबड्स; बॅटरी आणि साऊंडमध्ये नंबर 1

Best TWS Earbuds : भारतात गेमिंगची क्रेझ झपाट्याने वाढत असून गेमर्स आता प्रोफेशनल गॅजेट्सला पसंती देत आहेत. विशेषतः BGMI, Call...

By: Team Navakal
Best TWS Earbuds
Social + WhatsApp CTA

Best TWS Earbuds : भारतात गेमिंगची क्रेझ झपाट्याने वाढत असून गेमर्स आता प्रोफेशनल गॅजेट्सला पसंती देत आहेत. विशेषतः BGMI, Call of Duty आणि Asphalt सारख्या गेम्ससाठी दर्जेदार आवाजाची गरज असते. गेमिंगचा खरा आनंद घेण्यासाठी आता तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. बाजारपेठेत सध्या असे अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत, जे लो लेटेंसी मोड आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतात.

1. boAt Immortal Katana Blade 2.0

कमी किमतीत जबरदस्त फीचर्स हवे असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत केवळ 1,299 रुपये आहे. यामध्ये 50ms लो लेटेंसी असलेला बीस्ट मोड दिला आहे. विशेष म्हणजे याची बॅटरी तब्बल 70 तास टिकते आणि फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यावर 180 मिनिटांचा प्लेबॅक मिळतो. आरजीबी एलईडी लाइट्समुळे याला खरा गेमिंग लूक मिळतो.

2. OnePlus Nord Buds 3r

ब्रँडेड आणि दर्जेदार आवाजासाठी वनप्लसचे हे इयरबड्स 1,799 रुपयांना उपलब्ध आहेत. यामध्ये 12.4mm ड्रायव्हर्स आणि 47ms लो लेटेंसी मोड दिला आहे. यात 3D स्पॅशिअल ऑडिओ आणि एआय ट्रान्सलेशन सारखे प्रगत फीचर्स आहेत. एकदा फुल चार्ज केल्यावर याची बॅटरी 54 तासांपर्यंत साथ देते.

3. GOBOULT x Mustang Torq

स्टायलिश डिझाइन आवडणाऱ्यांसाठी हे इयरबड्स 1,799 रुपयांना मिळतील. यामध्ये 13mm ड्रायव्हर आणि 45ms लो लेटेंसी देण्यात आली आहे. क्वाड माईक ईएनसीमुळे गेम खेळताना स्पष्ट संवाद साधता येतो. याची बॅटरी लाईफ 60 तासांची असून यात आकर्षक एलईडी लाईट्स देखील आहेत.

4. Noise Buds Marine

नॉईज कंपनीचे हे इयरबड्स 1,999 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे फुल मेटॅलिक केस आणि 32dB पर्यंत मिळणारे एएनसी सपोर्ट. यामध्ये 13mm स्पीकर ड्रायव्हर असून बॅटरी 35 तासांपर्यंत टिकते. यात ड्युअल डिव्हाइस पेअरिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.

5. CrossBeats Fury Max Gaming TWS

जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर 2,299 रुपयांना मिळणारे हे इयरबड्स सर्वोत्तम आहेत. यामध्ये चक्क 100 तासांची बॅटरी बॅकअप मिळते. तसेच 30ms इतकी कमी लेटेंसी आणि 6 माईक एआय ईएनसी मुळे गेमिंग अनुभव अधिक प्रगत होतो. यात ब्लूटूथ v5.4 ची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा – ‘ठाकरे बंधूंप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ’; निवडणुकीपूर्वी आनंदराज आंबेडकरांचे मोठे विधान; राजकीय समीकरणे बदलणार?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या