Home / लेख / Best Earbuds: गाणी ऐकताना बाहेरचा गोंगाट विसरा! तब्बल 83% डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ प्रीमियम ईअरबड्स

Best Earbuds: गाणी ऐकताना बाहेरचा गोंगाट विसरा! तब्बल 83% डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ प्रीमियम ईअरबड्स

Best Earbuds: चांगल्या दर्जाचे इअरबड्स केवळ गाणी ऐकण्यासाठीच नाही, तर कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात शांतता मिळवण्यासाठीही आवश्यक झाले आहेत. ‘ॲक्टिव्ह...

By: Team Navakal
Best Earbuds
Social + WhatsApp CTA

Best Earbuds: चांगल्या दर्जाचे इअरबड्स केवळ गाणी ऐकण्यासाठीच नाही, तर कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात शांतता मिळवण्यासाठीही आवश्यक झाले आहेत. ‘ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन’ (ANC) तंत्रज्ञानामुळे बाहेरील अनावश्यक आवाज रोखला जातो, ज्यामुळे ऑडिओचा दर्जा अधिक स्पष्ट होतो.

सध्या Amazon वर लोकप्रिय ब्रँड्सच्या इअरबड्सवर विशेष सवलत जाहीर झाली असून, काही मॉडेल्स तर अर्ध्याहून कमी किमतीत उपलब्ध आहेत.

1. Boat Nirvana Ion ANC

या इअरबड्सवर सध्या सर्वात मोठी म्हणजेच 83 टक्क्यांची सवलत मिळत आहे. 9,990 रुपये मूळ किंमत असलेले हे इअरबड्स आता फक्त 1,699 रुपयांना खरेदी करता येतील. यामध्ये 32dB पर्यंतचे नॉईज कॅन्सलेशन असून तब्बल 120 तासांची बॅटरी लाईफ मिळते. ज्यांना वारंवार चार्जिंगचे टेन्शन नको आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

2. Blaupunkt BTW300 Xtreme (2025 Edition)

जर्मन ब्रँड असलेल्या या इअरबड्सची किंमत 2,299 रुपये आहे. यामध्ये ‘ट्रू ANC’ तंत्रज्ञान दिले असून 700mAh ची मोठी बॅटरी मिळते. विशेष म्हणजे, ड्युअल पेअरिंग फीचरमुळे तुम्ही एकाच वेळी लॅपटॉप आणि मोबाईलला हे इअरबड्स जोडू शकता. चांगल्या आवाजासाठी यात क्वाड एआय माईकचा वापर करण्यात आला आहे.

3. OnePlus Nord Buds 3

तुम्ही जर ब्रँड आणि परफॉर्मन्सचा विचार करत असाल, तर हे इअरबड्स 2,299 रुपयांना (18% डिस्काउंट) उपलब्ध आहेत. केवळ 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर हे 11 तास वापरता येतात. यामध्ये 32dB चे ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन दिले असून एकूण 43 तासांचा प्लेबॅक मिळतो.

4. Noise Pure Pods (Open Ear)

ज्यांना कान पूर्णपणे बंद न करता गाणी ऐकायची आहेत, त्यांच्यासाठी ‘ओपन इयर’ डिझाइन असलेले हे बड्स उत्तम आहेत. 6,999 रुपयांचे हे पॉड्स 64 टक्के सवलतीसह 2,499 रुपयांना मिळताहेत. यात 16mm चे दमदार ड्रायव्हर्स आणि 80 तासांचा प्लेबॅक दिला आहे.

5. Noise Buds VS104

केवळ 799 रुपयांत मिळणारे हे सर्वात स्वस्त आणि मस्त इअरबड्स आहेत. 77 टक्के सवलतीसह मिळणाऱ्या या मॉडेलमध्ये 45 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. यात ‘इन्स्टाचार्ज’ फीचर असून 10 मिनिटे चार्ज केल्यावर 200 मिनिटे म्युझिक प्लेबॅक मिळतो, जे या किमतीत एक उत्तम वैशिष्ट्य आहे.

हे देखील वाचा – 85 हजारांचा स्मार्टफोन 50 हजारात; Nothing Phone 3 वर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, पाहा फीचर्स

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या