Best Smart TV Under 6500 : तुम्ही जर कमी बजेटमध्ये उत्तम पिक्चर क्वालिटीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या फ्लिपकार्टवर ₹6500 पेक्षाही कमी किमतीत तीन लोकप्रिय ब्रँड्सचे 24 इंचाचे स्मार्ट टीव्ही धमाकेदार ऑफर्ससह उपलब्ध आहेत.
हे टीव्ही उत्कृष्ट डिस्प्ले, दमदार साउंड आणि स्मार्ट फीचर्ससह मिनी थिएटरचा अनुभव देतात. त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.
1. KODAK Special Edition 60 cm (24 inch) स्मार्ट टीव्ही
कोडॅकच्या स्पेशल एडिशन 24 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर सध्या मोठी सूट मिळत आहे, ज्यामुळे तो सर्वात स्वस्त पर्याय ठरत आहे.
किंमत आणि ऑफर: फ्लिपकार्टवर हा टीव्ही केवळ ₹5,999 मध्ये उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये: यात एचडी रेडी रिझोल्यूशन (1366×768) आणि 20W च्या पॉवरफुल साउंड आउटपुटसह लहान खोल्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. लिनक्स ओएसवर चालणारा हा टीव्ही प्राईम व्हिडिओ, यूट्यूब आणि सोनी लिव्ह सारख्या ॲप्सला सपोर्ट करतो. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे.
2. Blaupunkt Sigma QLED 60 cm (24 inch) स्मार्ट टीव्ही
ब्लॉपंक्टच्या सिग्मा क्यूएलईडी 24 इंच स्मार्ट टीव्हीवरही उत्तम ऑफर्स सुरू आहेत.
किंमत आणि ऑफर: फ्लिपकार्टवर हा टीव्ही 6,299 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 5 टक्के कॅशबॅक आणि 10 टक्के बँक डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये याची किंमत आणखी कमी होऊ शकते.
वैशिष्ट्ये: यात 1366×768 पिक्सलचा एचडी रेडी डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा टीव्ही Amlogic प्रोसेसरवर चालतो आणि साउंडसाठी कंपनीने 24W चे स्पीकर आउटपुट दिले आहे. यात बिल्ट-इन वाय-फाय, स्क्रीन मिररिंग आणि यूएसबी पोर्ट्ससारखे फीचर्स आहेत.
3. Thomson Alpha QLED 60 cm (24 inch) स्मार्ट टीव्ही
थॉमसन अल्फा क्यूएलईडी 24 इंच स्मार्ट टीव्ही हा या सेगमेंटमधील आणखी एक लोकप्रिय पर्याय आहे.
किंमत आणि ऑफर: फ्लिपकार्टवर हा स्मार्ट टीव्ही ऑफर्ससह केवळ 6299 रुपयांमध्ये मिळत आहे. यासोबतच 5 टक्के कॅशबॅक आणि बँक ऑफर लावल्यास 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
वैशिष्ट्ये: यात 1366 x 768 पिक्सल रिझोल्यूशनसह 24 इंचाचा एचडी रेडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. थॉमसनचा हा टीव्ही Amlogic प्रोसेसरवर काम करतो आणि दमदार साउंडसाठी 2 स्पीकरसह 24 वॉटचे साउंड आउटपुट दिले आहे.
हे देखील वाचा – MG Windsor EV : ‘या’ इलेक्ट्रिक कारने सर्वांनाच लावले वेड, 50 हजार लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत-वैशिष्ट्ये जाणून घ्या









