Home / लेख / Smartphones under 6000 : ₹6,000 च्या आत बेस्ट ऑप्शन! दमदार फीचर्ससह येणारे ‘हे’ 3 स्मार्टफोन एकदा बघाच

Smartphones under 6000 : ₹6,000 च्या आत बेस्ट ऑप्शन! दमदार फीचर्ससह येणारे ‘हे’ 3 स्मार्टफोन एकदा बघाच

Best Smartphones under 6000 : तुमचे बजेट कमी असेल, पण तुम्हाला स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स हवे असतील, तर बाजारात तीन उत्तम...

By: Team Navakal
Smartphones under 6000
Social + WhatsApp CTA

Best Smartphones under 6000 : तुमचे बजेट कमी असेल, पण तुम्हाला स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स हवे असतील, तर बाजारात तीन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही फोनची किंमत ₹6,000 पेक्षा कमी आहे.

विशेष म्हणजे, या बजेटमध्ये तुम्हाला 5200mAh क्षमतेची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि व्हर्च्युअल रॅमच्या सपोर्टसह एकूण 6GB पर्यंतची रॅम मिळते. उत्तम प्रोसेसर आणि HD+ डिस्प्ले असलेले Lava आणि POCO चे हे फोन सध्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

Lava O3 Pro

4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ₹5,749 आहे. फोटोग्राफीसाठी दमदार 50 मेगापिक्सलचा AI ट्रिपल कॅमेरा सेटअप यात देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन 6.56 इंचच्या HD+ डिस्प्लेने सुसज्ज असून, यात Unisoc T606 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे.

POCO C71 – Locked with Airtel Prepaid

4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत Flipkart वर ₹5,699 आहे. POCO च्या या मॉडेलमध्ये Unisoc T7250 Max चिपसेट देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 6.88 इंचचा HD+ असून, यात 32 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5200mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Lava Bold N1 Lite

लावाचा हा फोन व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने एकूण 6GB रॅम देतो, ज्यात 3GB रिअल रॅम समाविष्ट आहे. Amazon इंडियावर याची किंमत ₹5,698 आहे. 64GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये Unisoc ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी मिळते. फोनचा डिस्प्ले 6.75 इंच असून, यात 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – OTT Releases : Family Man 3 ते Stranger Things… नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ 10 मोठे चित्रपट-सिरीज

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या