Home / लेख / Hill Station Travel: दार्जिलिंग, शिमला ते माथेरान; भारतातील ‘या’ आहेत 5 ऐतिहासिक टॉय ट्रेन, एकदा प्रवास नक्की करा

Hill Station Travel: दार्जिलिंग, शिमला ते माथेरान; भारतातील ‘या’ आहेत 5 ऐतिहासिक टॉय ट्रेन, एकदा प्रवास नक्की करा

Hill Station Travel | आजकाल प्रवास म्हणजे झपाट्याने एखाद्या ठिकाणी पोहोचण्याची धडपड झाली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा...

By: Team Navakal
Hill Station With Toy Trains

Hill Station Travel | आजकाल प्रवास म्हणजे झपाट्याने एखाद्या ठिकाणी पोहोचण्याची धडपड झाली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा प्रवास स्वतः एक अनुभव असायचा. अशाच अनुभवांची आठवण करून देतात भारतातील टॉय ट्रेन (Indian Toy Trains). छोट्या रूळांवरून डोंगरदऱ्यांमधून संथ गतीने धावणाऱ्या या ऐतिहासिक रेल्वे गाड्या आजही आकर्षणाचे केंद्र आहेत.

वसाहतकालीन काळात सुरू झालेल्या या नॅरो-गेज टॉय ट्रेन (Hill Station With Toy Trains) केवळ वाहतुकीचे साधन नसून त्या एक सांस्कृतिक वारसा आहेत. आजही त्या भारताच्या काही डोंगराळ भागांमध्ये कार्यरत आहेत आणि प्रवासाचे खरे सौंदर्य अनुभवायला मिळवून देतात. तुम्ही देखील ट्रिप प्लॅन करत असाल तर टॉय ट्रेन असलेल्या भारतातील या 5 हिल स्टेशन्सला नक्कीच भेट देऊ शकता.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे – 88 किलोमीटर लांबचा दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा प्रवास UNESCO ने जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे. न्यू जलपाईगुडी ते घूम असा हा प्रवास चहाच्या बागा, टोकदार वळणं आणि हिमालयाच्या कुशीतून जातो. चक्क रस्त्यातून धावणारी ही ट्रेन गावांमधून वाट काढत जाते. कांचनगंगाचे सौंदर्य अनुभवायचं असेल, तर हा अनुभव विसरता येणार नाही.

    कालका-शिमला रेल्वे – शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेली ही लाईन 800 पूल आणि 102 बोगद्यांमधून जाते. बरोग बोगद्याची भुतांची कहाणी ऐकूनच तुम्हाला थरार जाणवेल. हिमालयाच्या कुशीत चढत असताना प्रत्येक स्टेशन आणि वळण एक वेगळी कथा सांगते.

    निलगिरी माउंटन रेल्वे – जुन्या काळातील स्टीम इंजिन असलेली ही UNESCO वारशाची ट्रेन मेटुपालयम ते उटी दरम्यान धावते. ती जगातील मोजक्या रॅक अँड पिनियन ट्रॅकवर चालणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. हिरव्यागार वनराई, चहा मळे आणि निलगिरी पर्वतरांगांमधून जाणारा हा प्रवास नजरेसाठी मेजवानी ठरतो.

    नेरळ-माथेरान टॉय ट्रेन – माथेरान हे एकमेव हिल स्टेशन आहे जिथे वाहनांना बंदी आहे. नेरळ ते माथेरान या टॉय ट्रेनने जाणं म्हणजे एखाद्या जुन्या कथेत शिरल्यासारखं वाटतं. संथ गतीने जंगलातून, धुक्यातून आणि वळणावळणांतून जाणारा हा अनुभव अनोखा आहे.

    कुर्सेओंग – दार्जिलिंग मार्गावरील एक थांबा असलेले कुर्सेओंग हे शांततेसाठी ओळखले जाते. इथे उतरून DHR चा अनुभव अधिक प्रगल्भ करता येतो. ब्रिटिश-कालीन घरं, हिरवे चहा मळे आणि शांतता यामुळे हे ठिकाण दार्जिलिंगइतकंच मोहक वाटतं.

      या सर्व टॉय ट्रेन फक्त रेल्वे गाड्या नाहीत, त्या फिरता इतिहास आहेत.भारतातील निसर्ग, वारसा आणि परंपरेचं हे अद्भुत मिश्रण आहे. तुम्ही तुमच्या पुढील ट्रिपमध्ये नक्की टॉय ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

      Web Title:
      Topics:
      संबंधित बातम्या
      To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.