BGMI International Cup: आंतरराष्ट्रीय स्तरावरील BGMI International Cup (BMIC) 2025 स्पर्धेची घोषणा झाली आहे. भारतात BGMI गेमिंग यूजर्सची संख्या मोठी आहे. यंदा ही स्पर्धा दिल्लीत पार पडणार आहे.
31 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा 2 नोव्हेंबरपर्यंत यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे चालेल आणि आतापर्यंत भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय ईस्पोर्ट्स स्पर्धा ठरणार आहे.
या स्पर्धेत भारत, दक्षिण कोरिया (South Korea) आणि जपान (Japan) या तीन देशांतील एकूण 16 संघ विजेतेपदासाठी संघर्ष करतील.
BGMI International Cup: टॉप 16 संघांमध्ये थरार
BMIC 2025 मध्ये भारताचे आठ, दक्षिण कोरियाचे चार आणि जपानचे चार संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघांनी BGMI Showdown 2025 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान पक्के केले आहे.
- भारताचे प्रतिनिधित्व करणारे संघ: iQOO Orangutan, OnePlus K9 Esports, iQOO SOUL, Infinix True Rippers, OnePlus Gods Reign, Nebula Esports, Mysterious 4 आणि MADKINGS.
- दक्षिण कोरियाचे संघ: DPLUS, NS RedForce, Jecheon Phalanx आणि DRX.
- जपानचे संघ: REJECT, REIGNITE, MAKING The Road आणि CAG Osaka.
प्रत्येक संघ आपली खास रणनीती आणि गेमिंग कौशल्ये घेऊन मैदानात उतरणार असल्याने, चाहत्यांना उच्च-स्तरीय आणि थरारक सामने पाहायला मिळतील.
PMGC 2025 साठी थेट क्वालिफिकेशन
BMIC 2025 मध्ये जिंकण्यासाठी मोठे आव्हान आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन संघांना थेट PUBG Mobile Global Championship (PMGC) 2025 मध्ये प्रवेश मिळेल. PMGC ही मोबाइल ईस्पोर्ट्समधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते.
टूर्नामेंटचे एकूण पारितोषिक रक्कम 1 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. पहिल्या दोन संघांना केवळ कॅश रिवॉर्डच मिळणार नाही, तर त्यांना PUBG Mobile Global Championship (PMGC) 2025 मध्ये थेट प्रवेश देखील मिळेल.
प्रत्येक फेरीत आणि प्रत्येक गेमप्लेमध्ये अचूकता, सांघिक कार्य आणि योग्य रणनीती अत्यंत महत्त्वाची असेल, ज्यामुळे ही स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
तीन दिवसांच्या या स्पर्धेमुळे भारतात स्पर्धात्मक गेमिंग (कशा प्रकारे वाढत आहे आणि जागतिक ईस्पोर्ट्स नकाशावर देशाची उपस्थिती किती वाढत आहे, हे दिसून येईल. चाहत्यांना एलिट-लेव्हल स्पर्धा अनुभवण्याची आणि आपल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन देण्याची ही उत्तम संधी आहे.
हे देखील वाचा – देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकवर खास ऑफर; दिवाळीला खूपच स्वस्तात खरेदीची संधी