Best 65 Inch Smart TV : सध्या अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल (Black Friday Sale) धमाक्यात सुरू आहे, ज्यामुळे मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींच्या किमती घटल्या आहेत. जर तुम्ही 65 इंच आकाराचा टेलिव्हिजन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.
सॅमसंग, सोनी यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या टीव्हींवर बँक ऑफर आणि हप्त्यांच्या सोयीसह बंपर सवलती मिळत आहेत. आम्ही तुमच्यासाठी या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या 65 इंच टेलिव्हिजनवरील उत्तम मूल्य देणाऱ्या डील्सची माहिती खाली देत आहोत.
Best 65 Inch Smart TV : 65 इंच टेलिव्हिजनवरील टॉप डील्स
SONY Bravia 2 163.9 cm (65 inch) Ultra HD (4K): सोनीचा हा शानदार टीव्ही फ्लिपकार्टवर सवलतीनंतर 66,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, तर कॅनरा बँकेच्या कार्डावर 1,500 रुपयांपर्यंत सवलत आहे.
Samsung Crystal 4K Vivid 163 cm (65 inch) Ultra HD: सॅमसंगचा हा अल्ट्रा एचडी (Ultra HD) टीव्ही फ्लिपकार्टवर 33% सवलतीनंतर फक्त 57,990 रुपयांमध्ये मिळत आहे. यावर एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर 1,250 रुपयांपासून ते 2,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
Philips 165 cm (65 inches) 8100 Series 4K Ultra HD: अॅमेझॉनवर उपलब्ध असलेला हा टीव्ही 58,999 रुपयांवरून थेट 43,999 रुपयांना मिळत आहे. फेडरल बँक (Federal Bank) क्रेडिट कार्ड हप्त्यांच्या पर्यायावर 3,000 रुपयांपर्यंत आणि येस बँक कार्डावर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
realme TechLife 164 cm (65 inch) QLED Ultra HD: रियलमीचा (realme) हा क्यूएलईडी टीव्ही फ्लिपकार्टवर 55% पर्यंतच्या बंपर सवलतीनंतर फक्त 38,699 रुपयांना मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये 4,650 रुपयांपर्यंत तर एचडीएफसी बँक डेबिट कार्डवर 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो.
TCL 164 cm (65 inches) Metallic Bezel Less Series 4K: टीसीएल (TCL) कंपनीचा हा टेलिव्हिजन अॅमेझॉनवर सध्या 63% सवलतीनंतर केवळ 45,990 रुपयांना उपलब्ध आहे. फेडरल बँक क्रेडिट कार्ड हप्त्यांच्या पर्यायावर यावरही 3,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
हे देखील वाचा – Raj Thackeray : ‘मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल…’; राज ठाकरेंचे मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य









