Home / लेख / जिओ आणि एअरटेलला टक्कर! सरकारी कंपनीने आणला खास प्लॅन; 151 रुपयात 25 OTT प्लॅटफॉर्मची मजा

जिओ आणि एअरटेलला टक्कर! सरकारी कंपनीने आणला खास प्लॅन; 151 रुपयात 25 OTT प्लॅटफॉर्मची मजा

BSNL BiTV Plan Price

BSNL BiTV Plan Price: सरकारी टेलिकॉमकंपनीने BSNL ने आपल्या मोबाइल ग्राहकांसाठी नवा BiTV प्रीमियम पॅक लाँच केला आहे. हा पॅक नुकताच लाँच करण्यात आला असून, यामुळे यूजर्सला एकाच ॲपमध्ये अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहता येणार आहेत.

या पॅकची किंमत फक्त 151 रुपये इतकी ठेवण्यात आली असून, यामुळे जिओ-एअरटेलला जोरदार टक्कर मिळू शते.

BSNL BiTV प्रीमियम पॅक: किंमत आणि फायदे

BSNL ने एक्स (ट्विटर) पोस्टद्वारे या नव्या पॅकची घोषणा केली आहे. या पॅकमध्ये यूजर्सला Aha, ZEE5, SonyLIV, Shemaroo, Sun Nxt Chaupal, Lionsgate, ETV Win, Discovery आणि Epic ON यांसारख्या 25 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 450 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहता येतील.

कंपनीने या पॅकच्या वैधतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी, एका रिपोर्टनुसार या पॅकची वैधता 30 दिवसांची आहे.

इतर स्वस्त प्लॅनही उपलब्ध

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये BiTV सेवा सर्व BSNL ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध होती. आता कंपनीने एक प्रीमियम पॅक जाहीर केला असला, तरी काही स्वस्त प्लॅनही उपलब्ध करून दिले आहेत. रिपोर्टनुसार, BSNL ने 28 रुपये आणि 29 रुपयांचे दोन स्वस्त एंटरटेनमेंट प्लॅनही लाँच केले आहेत.

28 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून, यात Lionsgate Play, ETV Win आणि Nammflix यांसारख्या 7 ओटीटी प्लॅटफॉर्मसह 9 अतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

29 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे, पण यात ShemarooMe, Lionsgate Play, Dangal Play आणि VROTT हे ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ

‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…

पंजाबमध्ये महापुराचा कहर! मदतीसाठी लष्करही पोहोचले