Home / लेख / 365 दिवस टेन्शन फ्री! सरकारी कंपनीने लाँच केला 2799 रुपयांचा प्लॅन; दिवसाचा खर्च 8 रुपयांहून कमी

365 दिवस टेन्शन फ्री! सरकारी कंपनीने लाँच केला 2799 रुपयांचा प्लॅन; दिवसाचा खर्च 8 रुपयांहून कमी

BSNL 2799 Plan Details : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणण्यासाठी ओळखली जाते....

By: Team Navakal
BSNL 2799 Plan Details
Social + WhatsApp CTA

BSNL 2799 Plan Details : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणण्यासाठी ओळखली जाते. आता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या युजर्सना एक खास भेट दिली आहे.

बीएसएनएलने बाजारात एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 2799 रुपये आहे. हा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध झाला असून, तो विशेषतः अशा लोकांसाठी डिझाइन केला आहे ज्यांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागतो.

दिवसाचा खर्च फक्त 7.66 रुपये

बीएसएनएलच्या या नवीन 2799 रुपयांच्या प्लॅनची वैधता पूर्ण 365 दिवस म्हणजेच एक वर्ष आहे. जर आपण किमतीचा वैधतेशी हिशोब केला, तर या प्लॅनचा दैनंदिन खर्च फक्त 7.66 रुपये येतो. इतक्या कमी खर्चात ग्राहकांना वर्षभर अखंडित सेवा मिळणार आहे.

प्लॅनमध्ये काय-काय मिळणार?

  • डेटा: या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो. संपूर्ण वर्षाचा विचार केला तर ग्राहकांना एकूण 1095GB डेटा वापरता येईल.
  • कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • एसएमएस: दररोज 100 मोफत एसएमएस देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत.

खाजगी कंपन्यांना मोठी टक्कर

सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांसारख्या खाजगी कंपन्यांकडे असा एकही वार्षिक प्लॅन नाही जो दररोज 3GB डेटा देतो. खाजगी कंपन्यांच्या वार्षिक प्लॅनमध्ये साधारणपणे दररोज 2GB किंवा 2.5GB डेटा मिळतो, त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.

अशा परिस्थितीत बीएसएनएलचा हा नवा प्लॅन गेमचेंजर ठरू शकतो. ज्या युजर्सना वर्क फ्रॉम होम किंवा अभ्यासासाठी दररोज जास्त डेटाची गरज असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे.

हे देखील वाचा – Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या